मनी लाँडरिंगबाबत समन्स
By admin | Published: September 9, 2014 02:08 AM2014-09-09T02:08:43+5:302014-09-09T02:11:39+5:30
सद््गुरू पाटील ल्ल पणजी खनिज घोटाळ्यांतील मनी लाँडरिंग प्रकरणी खाण व्यावसायिक, अधिकारी व अन्य संबंधित घटकांना आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून समन्स
सद््गुरू पाटील ल्ल पणजी
खनिज घोटाळ्यांतील मनी लाँडरिंग प्रकरणी खाण व्यावसायिक, अधिकारी व अन्य संबंधित घटकांना आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून समन्स पाठविण्याचे काम सुरू केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंत खाण खाते, कस्टम आणि अन्य यंत्रणांकडून बरीच माहिती गोळा केली आहे. दरम्यान, खाण घोटाळ्यांतील मनी लाँडरिंगच्या प्रकरणांबाबत कारवाई डिसेंबरमध्ये सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.
अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीच एफआयआर नोंद केला आहे. त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. त्यामुळे विविध खात्यांकडून अंमलबजावणी संचालनालय माहिती गोळा करत आहे. गोव्याहून किती खनिजाची निर्यात झाली, कोणी किती रॉयल्टी चुकवली वगैरे माहिती गोळा करण्याचे काम विलक्षण गतीने
सुरू आहे. या प्रतिनिधीने सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाचे संयुक्त संचालक प्रवीण पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, शहा आयोगाच्या
सर्व अहवालांची प्रतही दिल्लीहून आमच्यापर्यंत आली आहे. आम्ही अभ्यास करत आहोत.
पवार म्हणाले, की येत्या महिन्यापासून विविध घटकांना समन्स पाठविण्याचे काम सुरू होईल. साधारणत: आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून समन्स निघेल.