पणजी : पाटो येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर उद्यान समोरील रस्ता नवा अपघात प्रवण क्षेत्र बनत आहे. येथील अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे. शुक्रवारीच दिवसभरात येथे दोन स्वयंअपघात झाले आहे. तसेच शनिवारी देखील रस्त्यांमुळे चालकांमध्ये भीती होती.
आंबेडकर उद्यान समोरील रस्त्यावर घातक वळणे आहेत, या वळणावर बहुतांश वेळेत वाहनांची पेट्रोल, किंवा ओ पडलेली असते, अशात दुचाकी चालकांना याचा नाहक त्रास होत असतो. तसेच अनेकांना तर येथे जीवघेण्या अपघाताला देखील सामोरे जावे लागते. शुक्रवारी देखील याच रस्त्यावर ओइल सांडल्यामुळे दोन स्वयं अपघात झाले, यातील एका अपघातात पर्वरी येथील एक महिला देखील जखमी झाली.
अपघातावेळी त्या ठिकाणी पिंक फोर्सची गाडी जात होती. अपघात घडल्याचे पाहून त्यांनी ट्रॅफिक सांभाळले, व जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच तत्परता दाखवीत पोलिस आणि अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलविले. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचत रस्त्यावर सांडलेली ओइल पाण्याने धुवून टाकली. नंतर महानगर पालिकेतर्फे या रस्त्यावर माती टाकण्यात आली, जेणेकरून निसरट कमी होईल.
पावसाळ्यात सर्वाधिक घटना पाटोतील या भागात भागात स्वयं अपघाताच्या घटना घडत असतात. सर्वाधिक घटना पावसाळ्यात होत असतात. या रस्त्यावर झाड्याची पाने पडत असल्याने निसरून पडण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबत मनपाला देखील तेथील व्यापाऱ्यांनी कळविले असता, त्यांच्याकडून देखील अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.