राज्यात पर्यटन खात्यातर्फे स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचे आयोजन

By समीर नाईक | Published: May 16, 2024 03:44 PM2024-05-16T15:44:37+5:302024-05-16T15:44:54+5:30

स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचा उद्देश राज्याची संस्कृती आणि वारसा वाढवणे असेल. आधुनिक काळातील कलात्मक अभिव्यक्तींना त्यांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत प्रदर्शित करण्यासाठी हा उत्सव एक व्यासपीठ म्हणून काम करेल.

The Spirit of Goa Festival is organized by the Department of Tourism in the state | राज्यात पर्यटन खात्यातर्फे स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचे आयोजन

राज्यात पर्यटन खात्यातर्फे स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचे आयोजन

पणजी: राज्यात दि. १७  ते १९ मे या कालावधीत पर्यटन खात्यातर्फे स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोलवा येथील एसएजी मैदानावर हा महोत्सव होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्याच्या समृद्ध संस्कृतीचा, संगीताचा आणि प्राचीन वारशाचे दर्शन होणार  आहे.

स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचा उद्देश राज्याची संस्कृती आणि वारसा वाढवणे असेल. आधुनिक काळातील कलात्मक अभिव्यक्तींना त्यांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत प्रदर्शित करण्यासाठी हा उत्सव एक व्यासपीठ म्हणून काम करेल. याव्यतिरिक्त हा उत्सव नारळ आणि काजूपासून बनविलेले विविध उत्पादने, पेये, पाककृती आणि हस्तकला केलेली कलाकुसर यांचे प्रदर्शन भरवेल. तसेच  उराक आणि फेनी सारख्या घरगुती उत्साहवर्धक पेयांचा देखील समावेश असेल. 

महोत्सवाचा पहिला दिवस गोव्याच्या विविध संगीत कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमांनी सुरू होईल. राज्यातील प्रसिद्ध कलाकार, कांता गावडे व इतर मंडळी राज्यातील पारंपरिक नृत्याचे प्रदर्शन करणार आहेत.

स्पिरिट ऑफ गोवा फेस्टच्या दुसऱ्या दिवशी गोव्याची शान प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांच्या गाण्यांचे सादरीकरण असेल. अल्टीट्यूड आणि ज्यूक बॉक्स ट्रायओ सोबत, संगीत आणि मनोरंजनाची एक अविस्मरणीय रात्र अनुभवता येईल.

तिसऱ्या दिवशी महोत्सवाच्या महाअंतिम फेरीत ट्वेंटीफोर के इंडिया, क्रिमसन टाइड आणि बँड ॲम्बेसेडर यांचे उत्कृष्ट सादरीकरण होईल. स्पिरिट ऑफ गोवा फेस्टिव्हल हा संगीत कार्यक्रमापेक्षा अधिक मनोरंजक असेल.

Web Title: The Spirit of Goa Festival is organized by the Department of Tourism in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा