लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : दिवाळी काही दिवसांवरच येऊन पोहोचली आहे. या सणाला अनेकजण आपल्या गावी जातात. तसेच दिवाळीच्या सुट्टीवेळी अनेकजण सहलींचे आयोजन करतात. रेल्वेतून प्रवास करण्यास अधिक पसंदी दिली जाते.
मडगावहून मुंबईला निघाणाऱ्या प्रत्येक रेल्वेचे तिकिट फुल्ल आहे. वेटींग लिस्टचा आकडाही वाढत आहेत. मडगावातून मुंबईला दिवा पॅसेजर, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी, तेजस, वंदेभारत व कोकण कन्या एक्सप्रेस या गाड्या धावातात. सणासुदिच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. दोन-तीन महिने आधीच तिकीट बूक केले जाते. ज्यादा गाड्या देऊनही प्रवाशांसाठी सेवा अपुरीच पडत आहे.
सर्वाधिक गर्दी
मडगावातून मुंबईला धावणाऱ्या कोकण कन्या, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी, तेजस व वंदेभारत या गाडयांना सर्वाधिक गर्दी असते. आरमदायी प्रवासासाठी या रेल्वे चांगल्या आहेत. प्रवाशी या गाडयांतून प्रवास करण्यास प्राधान्य देतात.
तत्काळ, प्रमियम तत्काळ काय?
तत्काळ सेवेतंर्गत प्रवाशांना मूळ तिकीटाच्या दरापेक्षा जास्त रक्कम फेडावी लागते. सेंकड क्लाससाठी १० टक्के ज्यादा तर 'अन्य वर्गातील डब्यातून प्रवासासाठी ३० टक्के ज्यादा असा हा दर आहे तर प्रमियम तात्काळ आपण प्रवासाच्या एक दिवस अगोदर बुक करु शकतात.
या मार्गावर वेंटीग
गोव्यातून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या मार्गावर नेहमीच रेल्वे तिकीट कन्फर्म मिळणे दुरापास्तच असते. दिवाळीच्या सणाला तर रेल्वे हाउसफुल्लच असतात. यंदाही हीच स्थिती आहे.
मुंबई: मुंबईला धावणाऱ्या सर्व रेल्वेचे तिकीटे फुल्लच आहेत. तर अनेक प्रवाशांची तिकीटे वेटींग लिस्टवर आहेत.
दिल्ली: दिल्लीला धावणाऱ्या रेल्वेचेही तिकिट फुल्ल आहे. राजधानी एक्सप्रेसला प्रवाशी सर्वात अधिक पंसदी देतात. या रेल्वेचे तिकीट मिळणे कठीणच असते
मडगावातून मुंबईला सहा रेल्वे धावतात. या शिवाय साप्ताहिक रेल्वेही असतात. स्पेशल रेल्वेही धावतात. प्रवाशांना सर्वसोयी उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रयत्नरत आहेत. - बबन घाटगे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे महामंडळ.