मडगाव: भाजपाचे राष्ट्रीय नेते शाहनवाज हुसेन यांच्या नागरिक दुरुस्ती विधेयक संबधीच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या तीन स्थानिक मुस्लीम नेत्याविरुध्द आक्षेपार्ह फलक उभारल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांनी दोघांजणाच्या मुसक्या आवळल्या तर एक संशयित सदया फरार आहे. गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मायणा - कुडतरी पोलीस ठाण्यात मागच्या शनिवारी ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करताना नईम सय्यद नईम सय्यद (२२) व इम्रान उर्फ सलमान खान नागरहोली (२६) यांना अटक केली तर अन्य एक संशयित कादर शहा हा सदया फरार आहे. त्याचा शोध चालू असल्याची माहिती मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांनी दिली.
नईम हा रुमडामळ तर इम्रान हा दवर्ली येथे रहात आहे. इम्रानने एकूण १४ बॅनर तयार केले होते असेही तपासात आढळून आले आहे. त्यातील चार त्याने कादर याला दिले होते असे उघड झाले आहे. मागच्या शनिवारी दवर्ली मशिदीच्या कुंपणावर भाजपाचे स्थानिक नेते शेख जीना तसेच अश्रफ पंडियाल आणि शेख अस्लम या दोघांच्या ासंबधी हे फलक लावले होते.
नागरिक दुरुस्ती कायदा विधेयकासंबधी भाजपा नेते शाहनवाज हुसेन यांनी मडगावात बैठक घेतली होती. यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याबददल या तिघांच्या नावे फलक लावून त्यांची बदनामी केली होती. सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३ , भारतीय दंड संहितेंच्या ५0४, ३२३ , ५0६ , ५00 या कलामखाली संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.