लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांत, गोव्यात 'या' दिवशी होणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 05:15 PM2024-03-16T17:15:34+5:302024-03-16T17:17:53+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यांत होणार असून, निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यांत होणार असून, निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि सातवा टप्पा १ जूनला होणार आहे. गोव्यातील दोन जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे.
आजपासून लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिताही लागू झाली आहे.
गोव्यात ७ मे रोजी होणार निवडणूक
गोव्यात दोन जागांसाठी ७ मे रोजी निवडणूक होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल आहे, तर अर्जाची छानननी २० एप्रिल रोजी होणार आहे. अर्ज २२ मे रोजी मागे घेण्याची मुदत आहे. मत मोजणी ४ जून रोजी होणार आहे.
कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर – दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर छत्तीसगड आणि आसाममध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये चार टप्प्यांत, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत आणि उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.