पणजीत आणखी नऊ ठिकाणी 'पे पार्किंग'; अधिसूचना जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 09:53 PM2020-08-28T21:53:48+5:302020-08-28T21:53:54+5:30
महापौर उदय मडकईकर यांनी ही माहिती दिली.
पणजी : राजधानी शहरात दुसऱ्या टप्प्यातील ‘पे पार्किंग’साठी अधिसूचना जारी केली आहे. निविदा काढून साधारणपणे ऑक्टोबरपासून शहरात आणखी नऊ ठिकाणी पे पार्किंग लागू होणार आहे.
महापौर उदय मडकईकर यांनी ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात १८ जून रस्ता, आत्माराम बोरकर मार्ग, हिंदू फार्मसी परिसर आदी पाच ते सहा ठिकाणी पे र्पाकिंगची अंमलबजावणी झालेली आहे. आता दुसºया टप्प्याची अधिसूचना काढण्यात आली असल्याने येत्या महिन्यात निविदा मागवून ऑक्टोबरपासून अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या नऊ ठिकाणी होणार ‘पे पार्किंग’-
- जुना पाटो पूल ते वृंदावन बिल्डिंग (पाटो सरकारी वसाहतीजवळ) व सपना बिल्डिंग ते कार्दोझ बिल्डिंग.
- महात्मा गांधी मार्गावर म्हामई कामत घर ते काकुलो बेट
- दयानंद बांदोडकर मार्गावर बेती फेरीधक्का ते सुलभ शौचालय
- नव्या पाटो पुलाजवळ केणी पेट्रोल पंप ते जुना पाटो पूल व टपाल मुख्यालयासमोर टोबॅको स्क्वेअर परिसर तसेच पोस्ट मास्तर जनरल कार्यालयाच्या मागील बाजुचा परिसर
- मिनेझिस ब्रागांझा मार्गावर कॅफे भोसले समोरील परिसर ते सेडमार अपार्टमेंट
- स्टेट बँकेच्या मागील बाजुस हॉटेल मांडवी ते कस्टम हाउस
- विनंती हॉटेल ते कस्टम हाऊस
- १८ जून रस्ता ते मिनेझिस ब्रागांझा रस्ता (नेपच्युन हॉटेलजवळ)
- जनरल बेर्नार्द गिडिस मार्ग ( आयनॉक्स ते गीता बेकरी ते सरकारी मुद्रणालय)
पे पार्किंगचे दर दुचाकींसाठी
- पहिल्या चार तासाकरिता ४ रुपये
- ४ ते १२ तासांकरिता ८ रुपये
- १२ ते २४ तासांकरिता १५ रुपये
चार चाकींसाठी
- पहिल्या एक तासाकरिता २0 रुपये
- नंतरच्या प्रत्येक तासाकरिता अतिरिक्त १५ रुपये
पे पार्किंग लागू होणार असलेल्या वरील नऊही ठिकाणी दरफलक लावले जातील. लवकरच पे पार्किंगसाठी आखणीही केली जाईल. सरकारी वाहने पे पार्किंगमधून वगळण्यात आली आहेत.