१०४९ शाळांमध्ये अक्षर सुधार कार्यक्रम
By admin | Published: March 5, 2016 01:50 AM2016-03-05T01:50:25+5:302016-03-05T01:56:28+5:30
सुंदर अक्षर हे विद्येचे आवश्यक अंग आहे, ही म्हण पुरातन काळापासून लागू पडते. विद्यार्थ्यांना सुंदर अक्षर काढता यावे .....
नरेश रहिले गोंदिया
सुंदर अक्षर हे विद्येचे आवश्यक अंग आहे, ही म्हण पुरातन काळापासून लागू पडते. विद्यार्थ्यांना सुंदर अक्षर काढता यावे तसेच त्यांनी केलेले लेखन शुध्द असावे यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून प्रयत्न केले जातात. जागतिक शुध्द लेख दिनानिमीत्त गोंदिया जिल्ह्यातील १०४९ शाळांत शुध्द लेखन व अक्षर सुधार कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेतील शिक्षक सुश्रुत लेखनाच्या आधारावर अक्षर सुधार कार्यक्रम अनेकदा राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून ५ मार्च हा दिवस शुध्द लेखन दिन म्हणून साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांत अक्षर सुधार कार्यक्रम व शुध्द लेखन कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली आहे. वाचन लेखन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुंदर अक्षर काढण्यास शिकवली जाते. शुध्द लेखनासंदर्भात वर्ग शिक्षक जेवढे शिकवेल तेवढेच शुध्द लेखन विद्यार्थ्याला शिकवले जाते. परंतु अनेक शिक्षकांनाच शुध्द लेखन येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात शुध्दलेखनाचे धडे ते देऊ शकत नाहीत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी शुध्द लेखनात मागे पडतो.
शुध्द लेखनासाठी विशेष वर्गाची आवश्यकता असते. परंतु शिक्षण विभागातर्फे विशेष वर्गाची सोय करण्यात आली नाही.