मॅकेन्झी अहवाल : पोलिसांच्या कार्यप्रणालीत सुसूत्रता, नक्षल क्षेत्रासाठी सुचविल्या सुधारणानरेश रहिले गोंदियापोलीस दलाला व्यावसायिक काम करण्यासाठी पोषक ठरणाऱ्या मॅकेन्झी अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यात आजघडीला आणखी १२४९ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज आहे. यातून पोलिसांच्या कामात सुसूत्रता आणून कार्यप्रणालीत आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पोलिसांवरील ताण कमी करण्याचे आव्हान सध्या गृह विभागावर आहे. यामध्ये मनुष्यबळाचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी अमेरिकन कन्सलटन्सी कंपनी मॅकेन्झीने राज्य शासनाला एक अहवाल सादर केला होता. त्यात सध्या असलेल्या कार्यप्रणालीत सुधारणा आणण्यासाठी, पोलिसांचे मॅनेजमेंट तसेच पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या, टपाल ड्युटी, कल्याण निधीतून त्यांच्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांचा सांगोपांग अभ्यास करण्यात आला.मॅकेन्झी अहवालानुसार गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासी असल्याने या जिल्ह्यात किती मनुष्यबळ असावे हे मॅकेन्झी अहवालाने दाखविले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आणखी ६ पोलीस निरीक्षक, १६१ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ७६ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ३६७ पोलीस हवालदार तसेच ६३९ पोलीस शिपाई असे एकूण १२४९ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे सांगण्यात येते.नक्षलप्रभावित गोंदिया जिल्ह्यात या अहवालानुसार नक्षलविरोधी कारवायांमध्ये आणखी सुधारणा करून त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाणार आहे. यातून पोलिसांवरील ताण कमी होईल.
आणखी हवेत १२४९ पोलीस
By admin | Published: September 07, 2016 12:21 AM