गोंदिया जिल्ह्यात ११ दिवसात १५१ विविध पक्ष्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 03:41 PM2021-01-20T15:41:14+5:302021-01-20T15:41:36+5:30

Gondia News गोंदिया जिल्ह्यात ८ ते १९ जानेवारी दरम्यान १५१ पक्ष्यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

151 different birds died in 11 days in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात ११ दिवसात १५१ विविध पक्ष्यांचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात ११ दिवसात १५१ विविध पक्ष्यांचा मृत्यू

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूची साथ सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात ८ ते १९ जानेवारी दरम्यान १५१ पक्ष्यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

यापूर्वी पुणे प्रयोगशाळेत पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल विभागातर्फे कळविण्यात आला.

गोंदिया तालुक्यातील बिर्सी विमानतळ क्षेत्रातील एक कावळा, गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील एक बगळा व नागझिरा अभयारण्य क्षेत्रातील एक पोपट प्राथमिक चाचणीत एच-५ करिता पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर हे नमुने पुढील खात्रीकरिता राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. या क्षेत्रांमध्ये सर्वेक्षणाचे काम चालू आहे. बिर्सी, कुऱ्हाडी व नागझिरा क्षेत्रांसह कुक्कुट पक्ष्यांमध्ये मृत्यू झालेल्या गोंदिया तालुक्यातील एकोडी व गोरेगाव तालुक्यातील निंबा या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे

आढळल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात द्यावी, अश्या सूचना पशुसंवर्धन विभागाने केल्या आहेत.

माहितीसाठी टोल फ्री क्रमांक

मृत पक्ष्यांची माहिती पशुसंवर्धन विभागाला त्वरित देण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रण कक्षास ९४२३१०४५८० व  १८००२३३०४१८

या टोल फ्री क्रमांकांवर त्वरित संपर्क करून त्याची माहिती द्यावी. मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करू नये. ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा उद्रेक झालेला आहे, त्याच ठिकाणी रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

Web Title: 151 different birds died in 11 days in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.