नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिव्यांग मुला-मुलींना नोकरी न लागल्यास त्यांनी आपल्या अवस्थेवर पश्चाताप करुन वेळ घालवू नये. त्यांना आत्मबळ व स्वयंरोजगाराची कास धरता यावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी विद्यार्थी दशेतच किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. जिल्ह्यातील २२० दिव्यांग विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होणार आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सामान्य माणसाच्या तुलनेत कुठेच मागे राहू नये यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी आर.राजा दयानिधी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किमान कौशल्य विकास कार्यक्रम सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सुरु केले आहे. यंदा गुढीपाडव्याला पहिल्या वर्गात प्रवेश घेणाºया दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या १०९ आहे. तर या वर्षी प्रशिक्षण देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १११ आहे.याचे दिले प्रात्यक्षिकफाईल तयार करणे, खडू बनविणे, टेडी बिअर, पाय पुसणे, फोटो फ्रेमींग, पाककला, राख्या बनविणे, अगरबत्ती बनविणे, श्रवण यंत्र दूरुस्ती, रांगोळी, बुरड काम, टेबल क्लॉथ, पायदान, स्प्रींग प्रिटींग असे विविध प्रशिक्षण देण्यात आले.महाराष्ट्रातील पहिला उपक्रम१ मे ते २० जून दरम्यान जिल्हाभरात किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दिव्यांगाना स्वयंरोजगार करता यावे यासाठी मुकाअ दयानिधी यांनी सुरु केलेला हा उपक्रम फक्त महाराष्ट्रातील गोंदियातच सुरु असल्याचे सांगीतले जाते. शिक्षणाधिकारी उल्हास नरड व मुकाअ दयानिधी यांनी स्वत: प्रशिक्षणस्थळी जाऊन विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्यांची पाहणी केली.शिक्षकांना दिले प्रशिक्षणदिव्यांग विद्यार्थ्याना विविध कला कौशल्य शिकविण्यासाठी शिक्षकाला ती कला अवगत व्हावी यासाठी त्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिक्षकांनी उत्तम मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना शिकविले आहे.
२२० दिव्यांगांचा कौशल्य विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 9:24 PM
दिव्यांग मुला-मुलींना नोकरी न लागल्यास त्यांनी आपल्या अवस्थेवर पश्चाताप करुन वेळ घालवू नये. त्यांना आत्मबळ व स्वयंरोजगाराची कास धरता यावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी विद्यार्थी दशेतच किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
ठळक मुद्देयंदा पहिल्या वर्गात १०९ दिव्यांग : किमान कौशल्याच्या १११ विद्यार्थ्यांना टिप्स