२५ शिक्षकांना गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:32 PM2018-09-30T22:32:24+5:302018-09-30T22:33:00+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदिया व लायन्स क्लब गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.२८) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २५ शिक्षकांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिवाजीराव बडे यांच्या द्वारे लिखित परमवीर चक्र पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदिया व लायन्स क्लब गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.२८) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २५ शिक्षकांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिवाजीराव बडे यांच्या द्वारे लिखित परमवीर चक्र पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
उद्घाटन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. दिपप्रज्वलन डी. आय. ई. सी. पी. डी. प्राचार्य राजेश रूद्रकार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे राज्य निमंत्रक लिलाधर पाथोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुरकर, सविता तूरकर, राजेश्वर कनोजीया, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सुधाकर डोये, शिक्षण विस्तार अधिकारी ए.के. खडसे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेन्द्र कटरे, विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, सरचिटणीस अनिरूद्ध मेश्राम, कार्याध्यक्ष उमाशंकर पारधी,जिल्हा संघटक केदारनाथ गोटाफोडे, महिला जिल्हा प्रमुख यशोधरा सोनवाने, आमगाव तालुकाध्यक्ष सूरेश रहांगडाले, तिरोडा तालुकाध्यक्ष नरेंद्र आगाशे, प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेचे उपाध्यक्ष शंकर नागपूरे, संचालक पवन कोहळे, शंकर चव्हाण, वाय. बी. पटले उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी नेहमी तत्पर रहावे असे मत व्यक्त केले. आमदार रहांगडाले यांनी, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे सांगीतले. याप्रसंगी तालुक्यातील १३ केंद्रांमधील उत्कृष्ट कार्य करणाºया २५ आदर्श शिक्षक व खमारी केंद्राच्या केंद्रप्रमुख अंजली ब्राम्हणकर यांचा सन्मानपत्र व गौरव पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष योगानंद पटले यांनी मांडले. संचालन हेमंत पटले यांनी केले. आभार विनोद लिचडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी शिक्षक संघाचे सरचिटणीस मोरेश्वर बडवाईक, गणेश चुटे, विनोद सुर्यवंशी, केशव मानकर, प्रविण नरु ले, राजेंद्र निंबार्ते, जी. एच हरिणखेडे, आर. जी. मेश्राम, बी. वाय फुले, देवेंद्र जचपेले, सुनील सोनवाने, रेखा ठाकरे, गिता मेंढे, एस. पी. कुंभलकर, एम. आर. बोपच, मोहन शहारे, वरु न दिप, एन. जे. डहाके, एन. जे. कटरे, निरंजन सोनकल्यारी, एच के पटले, श्रीधर पंचभाई, मुनेश्वर जैतवार, के. बी. नेवरे, वाय. बी. चावके, शैलेश गौतम, दुर्गेश रहांगडाले, सचिन वडीचार, संतोष तुरकर, ओ. बी. चौधरी, ओ. आय. रहांगडाले, आनंद मेश्राम, माणिक घाटघुमर, लोकेश कटरे, आर. एस. चव्हाण, विलास धकाते, व्ही एन. कोरे, भैय्यांलाल भोतमांगे, के. एल. कावळे, आर. एच. राऊत, डी. सी. रहांगडाले, एम. जी. हटिले, विष्णू तुरकर, अरु ण राहुलकर, राजेश बिसेन, एच. डी. भेलावे, मधू मेंढे, आर जी हुमणे, संतोष टेंभरे, एस. डी. खोटेले, आर. आर. चौधरी, टी. एम. शहारे, सुनील चौरागडे, एस. एम. बिसेन, तुलशी कटरे, हर्ष पवार, एम. डी. फड, श्यामकुमार बिसेन, विरेंद्र कावळे, गणेश चव्हाण, एन. जे कटरे, जे. एस. कटरे, हेमराज पारधी, अरु ण राहुलकर, राजेश बिसेन, के. के. पटले, हेमंत बिसेन, महेश कोरे, एम. एस. नांदगाये व तालुका कार्यकारणीतील सदस्यांनी सहकार्य केले.