लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाजात स्त्री भ्रुणहत्या होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना अंमलात आणली. ही योजना १ ऑगस्ट २०१७ रोजी किंवा त्यानंतर जन्मास आलेल्या मुलींसाठी सुरू करण्यात आली. असे असतानाही मागील २ वर्षांच्या काळात जिल्ह्यात या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. फक्त ३३९ कुटुंबाना आतापर्यंत या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.एक किंवा दोन कन्या रत्न असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शिवाय लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा, बालगृहातील मुलींनाही हा लाभ देण्यात येईल, एक लाख ते सात लाख ५० हजारांपर्यंत उत्पन्न असणारे यासाठी पात्र असून माता-पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. असे असतानाही महिला बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत या लाभासाठी फक्त ५४९ अर्ज करण्यात आले.यांतर्गत, गोंदिया- १ या कार्यालयामार्फत २८, गोंदिया- २ कार्यालयामार्फत ७३, अर्जुनी-मोरगाव २१, सालेकसा १०, देवरी आठ, सडक-अर्जुनी ५०, आमगाव १९, तिरोडा ४१, गोरेगाव ५१, गोंदिया नागरीमार्फत ३८ अशा एकूण ३३९ लोकांना लाभ देण्यात आला आहे. ३३९ लाभार्थ्यांचे डीडी तयार करून महिला विकास विभागाला मिळाले आहेत. उर्वरीत लाभार्थ्यांचे डीडी तयार करण्यासाठी बँकेकडे पाठविण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका कन्येवर आॅपरेशन केल्याचा पुरावा, रेशनकार्डची झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स, बॅँक पासबुक व अपत्याचा जन्माचा दाखला जोडावा लागतो.असे आहे लाभाचे स्वरूपया योजनेच्या लाभासाठी एक कन्या असल्यास ५० हजार रूपये, दोन कन्या असल्यास २५ हजार रूपये ठेव, मुलगी ६ वर्षाची आणि १२ वर्षांची झाल्यास ठेव रकमेवरील व्याज मिळेल. तसेच १८ वर्ष पूर्ण झाल्यांतर मुद्दल व व्याज मिळेल. लाभार्थी मुलगी व तिची आई यांचे संयुक्त बचत खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडून दोघांना एक लाखांचा अपघात विमा पाच हजार ओव्हरड्राफ्ट, मुलीने वयाची १८ वर्ष पूर्ण केल्यास विम्याची रक्कम एक लाख रूपये बँकेच्या खात्यात टाकले जाते. एक कन्या अपत्य असलेल्या कुटुंबातील भाग्यश्रीच्या आजी-आजोबांना सोन्याचे नाणे दिले जाईल.एक कोटी २९ लाखांची मागणीगोंदिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी एक कोटी २९ लाख २५ हजार रूपयांचे अनुदान आवश्यक आहे, अशी मागणी ४ थ्या अर्थ नियोजनात करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ देण्यात येईल. ही रक्कम येताच प्रलंबित असलेल्या प्रकरणांना निकाली काढून लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.
३३९ कुटुंबांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ चा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 6:00 AM
एक किंवा दोन कन्या रत्न असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शिवाय लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा, बालगृहातील मुलींनाही हा लाभ देण्यात येईल, एक लाख ते सात लाख ५० हजारांपर्यंत उत्पन्न असणारे यासाठी पात्र असून माता-पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देजिल्हावासीयांची उदासिनता : उर्वरित कुटुंबाना लाभ देण्यासाठी एक कोटीची मागणी