नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत या शर्तीने पुढे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळा डिजिटल झाल्या व जिल्हा डिजिटलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहीला. मात्र डिजीटल जिल्ह्यातील ३६० शाळा अजूनही अप्रगत आहेत. २५ मुद्द्यांच्या निकषांवरून शाळा प्रगत ठरविण्यात येते. अप्रगत शाळांची संख्या बरीच आहे. १४ जुलै २०१७ रोजी आलेल्या नविन आदेशानुसार उर्वरीत शाळा प्रगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून अप्रगत शाळांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला कृतीत उतरवून प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काम करीत होते.शासनाने शाळा बोलक्या करण्यासाठी २५ निकष ठेवले होते. परंतु शासनाने १४ जुलै २०१७ ला काढलेल्या शासन निर्णयामुळे आता त्या २५ निकषांना शिथील करण्यात आले असून मूलभूत क्षमतेत ७५ टक्के गुण व अभ्यासक्रमावर आधारीत ६० टक्के गुण घेणाºया विद्यार्थ्यांस प्रगत समजले जाणार आहे. आधी विद्यार्थी प्रगत, वर्ग प्रगत व शाळा प्रगत केली जात आहे. ज्या शाळेतील ६० टक्के विद्यार्थी प्रगत झाले त्या शाळेला प्रगत समजण्यात येत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ३६० शाळा अजूनही अप्रगत आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष६ ते १४ वयातील बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मूलविहीन शाळा करणे, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण घेणे, कठिण विषयांविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीशी करणे, शाळा सुंदर करून विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम या उपक्रमातून करायचे आहे.४३.६८ शाळा अप्रगतविद्यार्थ्यांना प्रगत करण्याची शर्यत जि.प. शाळांमध्ये लागली होती. परंतु आता याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील २० शाळा अप्रगत आहेत. देवरी ५३, गोंदिया ७४, गोेरेगाव १७, सालेकसा ४२, सडक-अर्जुनी ५७, तिरोडा ५७ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४० शाळा अप्रगत आहेत. जिल्ह्यातील ७०९ शाळा प्रगत असून त्यांची टक्केवारी ६६.३२ आहे.
डिजिटल जिल्ह्यातील ३६० शाळा अप्रगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 9:36 PM
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत या शर्तीने पुढे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळा डिजिटल झाल्या व जिल्हा डिजिटलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहीला.
ठळक मुद्देप्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न अधुरे: मूलभूत क्षमतेत ७५ तर अभ्यासक्रमावर ६० टक्के गुण