शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपच्या निर्णयाला आमचा पाठिंबा; आमच्या मनात किंतू-परंतू नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती
2
“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
3
आता 'या' मंदिर परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांना बंदी, कारण...
4
कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 
5
"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता
6
चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त
7
“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण
8
"आघाडी नाही, स्वबळावर निवडणूक लढवणार", दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत 'आप'ची मोठी घोषणा
9
रतन टाटांनी बिग बींकडे मागितले होते उसने पैसे! कारण ऐकून बॉलिवूडचा 'शहेनशाह' झाला थक्क
10
अमित शाहांची भेट घेतल्याच्या चर्चांवर रविंद्र चव्हाणांनी सोडलं मौन; म्हणाले, "या दोन दिवसांत..."
11
कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!
12
देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार?
13
'योगी बाबां'मुळे Google चे सीईओ सुंदर पिचाई अडचणीत? मुंबई कोर्टाने पाठवली नोटीस
14
“राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत
15
दिल्ली - मुंबई एक्स्प्रेस वेवर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला; एका मजुराचा मृत्यू, तिघे जखमी
16
LIC ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस; अवघ्या 5 एका दिवसात ₹60000 कोटींची कमाई...
17
आंतरराष्ट्रीय गायिका दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखचं गाणं वाजल्यावर काय घडलं? व्हिडीओ तुफान व्हायरल
18
Maharashtra Politics : मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांशिवाय कोणीही मान्य नाही; आरएसएसचा भाजपला संदेश, घोषणेच्या विलंबामुळे नाराजी
19
युगेंद्र पवारांनीही मतपडताळणीसाठी अर्ज केला; अजून काका अजित पवारांचे अभिनंदन केलेले नाही...
20
देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल!

३७ रेतीघाट लिलावासाठी सज्ज

By admin | Published: January 03, 2015 1:26 AM

तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील ३७ रेतीघाटांच्या लिलावासाठी अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. येत्या १६ जानेवारीला या घाटांचा लिलाव होणार आहे.

मनोज ताजने गोंदियातीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील ३७ रेतीघाटांच्या लिलावासाठी अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. येत्या १६ जानेवारीला या घाटांचा लिलाव होणार आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रेतीमाफियांकडून सुरू असलेल्या अवैध रेती उपशाला आळा बसणार आहे. जिल्ह्यात एकूण १०७ रेतीघाट आहेत. त्यापैकी भूजल सर्व्हेक्षण विभागाने ४९ घाटांना लिलावास पात्र ठरविले होते. मात्र भौगोलिक अडचणींमुळे ४ रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करणे कठीण असल्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाकडून ४५ घाटांचाच प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला. त्यापैकी ३७ घाटांना मंजुरी मिळाली. त्या ३७ घाटांची किमान किंमत (अपसेट प्राईज) ठरवून तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. त्यांनी या लिलावाला अंतिम मंजुरी दिली आहे. ई-टेंडरिंग पद्धतीने ही लिलाव प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी संबंधित कंत्राटदारांची प्रशिक्षण कार्यशाळाही घेतली जात आहे. येत्या ८ तारखेला आॅनलाईन निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर १६ जानेवारी रोजी या निविदा उघडल्या जातील. ३७ रेतीघाटांमधून २ कोटी ८२ लाख ५५ हजार ५०० रुपये किमान महसूल मिळणे अपेक्षित आहे. सर्व रेतीघाटांचा लिलाव झाल्यास यापेक्षा जास्त महसूल मिळू शकतो. परंतू गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता सर्व रेतीघाटांचा लिलाव होणार की नाही याबाबत कोणतीही शाश्वती नाही. यावर्षी लिलाव होणाऱ्या घाटांची मुदत ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत राहणार आहे. गेल्यावर्षी २७ घाटांमधून २.२० कोटींचा महसूलगेल्यावर्षी लिलावासाठी ४४ रेतीघाट पात्र ठरले होते. त्यातून ४ कोटी १५ लाखांचा महसूल मिळणे अपेक्षित होते. मात्र तीन वेळा ई-टेंडरिंग केल्यानंतरही त्यापैकी केवळ २७ घाटांचा लिलाव होऊ शकला. त्यातून प्रत्यक्षात २ कोटी २० लाखांचा महसूल शासनाला मिळाला. त्यामुळे यावर्षी किती घाट प्रत्यक्षात लिलावात जाणार आणि शासनाला किती महसूल मिळणार याबाबत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या घाटांचा होणार लिलावगोंदिया तालुका- पुजारीटोला (कासा), डांगुर्ली, बनाथर, सतोना-१, महालगाव-२, किन्ही, तिरोडा तालुका- चांदोरी (बु), घाटकुरोडा-४, मांडवी, बिरोली, मुंडीपार, चांदोरी (खु), पिपरिया, घाटकुरोडा-२, अर्जुनी, आमगाव- पिपरटोला, ननसरी (मारबतघाट), बाम्हणी (गायकीघाट), घाटटेमणी-१, पदमपूर (मारबतघाट), मानेकसा, ननसरी-२, सावंगी (कुवाढास), महारीटोला-२, सडक अर्जुनी- कोरमारा, सावंगी-१, कोहळीटोला, बोथली, पिपरी-२, राका पळसगाव, वडेगाव, डोगरगाव खजरी, सौंदड-२, अर्जुनी मोरगाव- वडेगाव बध्या, गोरेगाव- बाघदेव तिल्ली, सालेकसा- दरबडा, देवरी- शिलापूर (ढिवरीनटोला),