४७ गावांचा पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 10:21 PM2019-06-23T22:21:41+5:302019-06-23T22:22:19+5:30

आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तर मागील दोन दिवसांपासून ४७ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावकऱ्यांना दूरवर भटकंती करावी लागत आहे.

47 water supply jam | ४७ गावांचा पाणी पुरवठा ठप्प

४७ गावांचा पाणी पुरवठा ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देपाईपलाईन फुटली : हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, दुरुस्तीचे काम सुरू, बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तर मागील दोन दिवसांपासून ४७ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावकऱ्यांना दूरवर भटकंती करावी लागत आहे.
आमगाव तालुक्यातील ४७ गावांना बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. या योजनेची पाईप लाईन किडंगीपार नाल्याजवळ शुक्रवारी दोन ठिकाणी फुटली. परिणामी हजारो लिटर पाणी शेतांमध्ये वाहून गेली. त्यामुळे पाईप लाईन परिसरातील शेतांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रविवारी सकाळी सुध्दा या योजनेच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून पाण्याचा अपव्यय सुरूच होता. संबंधित विभागाने पाईप लाईन दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र किडंगीपार नाल्याजवळ पाईप लाईनला मोठे भगदाड पडले असल्याने दुरूस्तीच्या कामाला विलंब लागत आहे. या योजनेतंर्गत आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाईप लाईन फुटली असल्याने मागील दोन दिवसांपासून या गावांचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे भर पाणीटंचाईच्या कालावधीत नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. ही पाणी पुरवठा योजना बरीच जुनी असल्याने पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन सुध्दा काही ठिकाणी जीर्ण झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन ठिकाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. आमगाव तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई असून या योजनेमुळे ४७ गावातील गावकºयांना पाणीटंचाईवर मात करण्यास काही प्रमाणात मदत झाली होती. मात्र दोन दिवसांपासून या योजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावातील सार्वजनिक विहिरी, बोअरवेलवरील गर्दी वाढली आहे. पाईप लाईन दुरूस्तीचे काम लवकर पूर्ण न झाल्यास या परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पाणीटंचाईच्या समस्येत भर
आमगावात तालुक्यातील काही भागात मागील दोन तीन महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या आहे. गावातील महिला दोन तीन कि.मी.अंतरावरुन पाणी आणून आपली तहान भागवित आहेत. मात्र बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन फुटल्याने या परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ झाली आहे.

Web Title: 47 water supply jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.