लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान पिकाला पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाकडून महिनाभरापासून पाणी सोडले जात आहे. मात्र कालवा फुटल्यामुळे सालेकसा तालुक्यातील तीन गावांतील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. परिणामी तीन गावातील या शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे. धानाला एका पाण्याची गरज असताना पाणी मिळत नसल्याने हे शेतकरी चिंतेत आहेत.सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरण आहे. या धरणातून दोन मोठे कालवे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तयार करण्यात आले. एक कालवा महाराष्ट्रात तर दुसरा कालवा मध्यप्रदेशात जातो. मध्यप्रदेशात जाणारा कालवा सालेकसा तालुक्यातील शेतांना पाणी देत पुढे जातो.सालेकसा तालुक्यातील बोदलबोडी, दरबडा व धानोली या तीन गावातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तयार करण्यात आलेले छोटे कालवे व वितरीका जागोजागी फुटल्यामुळे या तीन गावातील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळू शकले नाही. यंदा पाऊस उशीरा आला. परंतु दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडावे लागले. पिकाला पाण्याची गरज असताना पावसाने १५ दिवस पूर्वीच दडी मारल्यामुळे पिकांसाठी पाणी सोडण्यात आले. महिनाभरापासून कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळू शकले नाही.कालव्याला पाणी सोडले तेव्हा पहिल्यांदा कालव्यात पाणी आले. परंतु पाण्याचा जोर पाहून जिर्ण झालेले कालवे व वितरीकांच्या पाळी जागोजागी फुटल्या.विशेष करून सालेकसा तालुक्यातील दरबडा, धानोली व बोदलबोडी या तीन ठिकाणी कालवे मोठ्या प्रमाणात फुटल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळू शकले नाही.या संदर्भात शेतकऱ्यांनी कसेबसे फुटलेल्या ठिकाणी माती टाकून पाणी वाया जाऊ नये याची तजविज केली व पाटबंधारे विभागाला कळविले. परंतु सालेकसा येथील पाटबंधारे विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही.वारंवार तक्रार करूनही कालवे दुरूस्त न केल्यामुळे भग्न कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले मात्र शेतात पोहचू शकले नाही.या तीन ठिकाणी फुटला कालवाकालवेदरबडा ते धानोली या दरम्यान तीन ठिकाणी अंगराज कटरे, गुणवंत बिसेन, मनराज पटले या तीन शेतकऱ्यांच्या शेताजवळ कालवे फुटले आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या कालव्याची भग्नावस्था पाहून यंदा पाऊस समाधानकारक येऊनही पीक होणार किंवा नाही या चिंतेत शेतकरी आहेत.सालेकसा तालुक्यातील दरबडा, धानोली व बोदलबोडी येथील ६०० शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यासंदर्भात तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत.शारदा पटले,सरपंच, दरबडा (सालेकसा)
६०० शेतकऱ्यांचे धान संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 8:49 PM
धान पिकाला पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाकडून महिनाभरापासून पाणी सोडले जात आहे. मात्र कालवा फुटल्यामुळे सालेकसा तालुक्यातील तीन गावांतील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. परिणामी तीन गावातील या शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे.
ठळक मुद्देकालवा फुटला : महिनाभरापासून दुरुस्तीच नाही