लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद शाळेची पहिली घंटा २६ जून रोजी वाजली.या सत्राची पूर्व तयारी म्हणून १९ जूनला ४९२ व समूपदेशनातून २४ जूनला १३९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्यामुळे या बदलीत जास्तीत जास्त नक्षलग्रस्त भागाचा विचार करून बदल्या करण्यात आल्या. सर्वात जास्त शिक्षक देवरी तालुक्यात व सालेकसा तालुक्यात देण्यात आले आहेत. १९ जून रोजी करण्यात आलेल्या ४९२ शिक्षकांच्या बदल्यांत आमगावला ५१ शिक्षक, अर्जुनी-मोरगाव ६१, देवरी ६२, गोंदिया ९७, गोरेगाव ५९, सालेकसा ५०, सडक-अर्जुनी ५३, तिरोडा ५९ असे एकूण ४९२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचेच काम असेल तर कार्यालयात या अन्यथा शाळेत जा,विद्यार्थ्यांना शिकवा असा सल्ला शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी शिक्षकांना दिला. त्यानंतर पुन्हा २४ जून रोजी १३९ शिक्षकांचे समूपदेशन करून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात इतर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १९ शिक्षकांना गोंदिया जिल्ह्यात आणण्यात आले.त्यांचेही समूपदेशन करण्यात आले. सोमवारी रात्री पर्यंत आदेश देण्यात होते.२५ जूनला शाळेत रूजू व्हा अन्यथा आलेल्या जिल्ह्यात परत जा असे खडे बोल प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांना सुनावले होते.
जिल्ह्यातील ६३१ शिक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:43 PM
जिल्हा परिषद शाळेची पहिली घंटा २६ जून रोजी वाजली.या सत्राची पूर्व तयारी म्हणून १९ जूनला ४९२ व समूपदेशनातून २४ जूनला १३९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्यामुळे या बदलीत जास्तीत जास्त नक्षलग्रस्त भागाचा विचार करून बदल्या करण्यात आल्या.
ठळक मुद्देआंतरजिल्हा बदलीचे १९ शिक्षक : १३९ शिक्षकांच्या समूपदेशनातून बदली