बचत गटातून ६८ हजार महिला आर्थिक उन्नतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 09:12 PM2019-06-22T21:12:56+5:302019-06-22T21:13:48+5:30

हाताला काम नसलेल्या महिलांना बचत गट तयार करून दिले. बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपली आर्थिक प्रगती साधण्यात गोंदिया जिल्ह्यातील ६८ हजार महिला यशस्वी झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन आपला रोजगार सुरू केला आहे.

68 thousand women financially from the savings group | बचत गटातून ६८ हजार महिला आर्थिक उन्नतीवर

बचत गटातून ६८ हजार महिला आर्थिक उन्नतीवर

Next
ठळक मुद्देबचत गटांना कर्ज देण्यात गोंदिया राज्यात तिसरा। २२११ बचत गटांना दिले ३६ कोटी ७८ लाखांचे कर्ज

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हाताला काम नसलेल्या महिलांना बचत गट तयार करून दिले. बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपली आर्थिक प्रगती साधण्यात गोंदिया जिल्ह्यातील ६८ हजार महिला यशस्वी झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन आपला रोजगार सुरू केला आहे. त्यांनी लघु उद्योग सुरू करून त्यातून आपला विकास करणे सुरू केले आहे. बचत गटाच्या महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आल्यामुळे गोंदिया बचतगटांना कर्ज देण्यात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यात ४१६ गावांत ५ हजार ६८९ बचतगट असून या बचत गटापैकी २ हजार २११ गटांना ३६ कोटी ७८ लाख ८१ हजार ९०७ रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. शासनाने बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा जीवनाचा आधार मिळाला आहे. कर्जाच्या स्वरूपात घेतलेल्या रकमेतून महिला जिल्ह्यात सर्वात जास्त शेळीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. दुग्ध व्यवसाय करणाºया बचत गटांची संख्या त्याच्या पाठोपाठ आहे. जिल्ह्यातील अनेक बचत गटांनी स्वत:च्या दुग्ध डेअरी सुरू केल्या आहेत. महिलांनी कुठलाही पैसा खर्च न करता अगरबत्ती, मेनबत्ती, पोल्ट्री फार्म, आलू लागवडची काम या बचत गटांनी केली आहे. ग्रामीण भागातील महिला आता स्वयंरोजगार बचत गटाच्या माध्यमातून करून त्यांनी आर्थिक उन्नती साधण्याचा ध्यास धरला आहे.बचत गटाच्या महिलांना अधिक कर्जाची गरज असलेल्या पाच-पाच महिलांना एकत्र आणून त्यांचे संयुक्त दायीत्व गट असे ५४ गट तयार करण्यात आले आहे. त्यांना एक कोटी २५ लाख ८० हजार रूपये कर्ज देण्यात आले. तसेच मुद्रा योजनेतून १२३ गटांना १ कोटी ३० लाख ४८ हजार रूपये कर्ज देण्यात आले.

बचत गटांचा ९८ टक्के नियमीत परतावा
गोंदिया जिल्ह्यातील बचत गटांना विविध योजनेतून ३९ कोटी ३५ लाख ९ हजार ९०७ रूपयाचे कर्ज सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात देण्यात आले. महराष्ट्रात ठाणे प्रथम, सोलापूर द्वितीय व गोंदिया जिल्हा कर्ज देण्यात राज्यात तृतीय क्रमांकावर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज घेणारे बचत गट कर्जाच्या किस्तीचा ९८ टक्के बचतगट परतावा नियमीत करतात.
लाखाचे दागिने सात गावात
लाखापासून मौल्यवान दागिने तयार करून त्यांना बाजारपेठेत विक्री करे पर्यंतची मजल या बचत गटांनी मारली आहे. बाजारात त्या दागिन्यांना चांगला भाव मिळेल अशा वस्तू लाखापासून तयार करीत आहेत. देवरी तालुक्याच्या सात गावात लाखाचे उत्पादन घेऊन त्याची प्रक्रिया करून लाखाचे दागिने तयार करण्याचे काम केले जात आहे.

प्रत्येक तालुक्यात बोकड संगोपन केंद्र
गोंदिया जिल्ह्यातील महिला बचतगट मोठ्या प्रमाणात शेळीचा व्यवसाय करीत असल्याने आता प्रत्येक तालुक्यातील १५ ते २० बचतगट एकत्र येऊन त्यांनी बोकड संगोपन केंद्र सुरू केले आहेत. त्या बोकड केंद्रातील एक महिला त्या बकऱ्यांची राखन करते तिला मजुरी दिली जाते. तिला पशू सखी म्हणून नाव देण्यात आले आहेत.
काटेकोहळ्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात
गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेणखताच्या कचºयात आढळणारा काटेकोहळ्याला गोंदिया जिल्ह्यात कवडीची किंमत नसली तरी त्या काटेकोहळ्याचा वापर आगऱ्याचा पेठा तयार करण्यासाठी केला जातो. याचे उत्पादन आमगाव तालुक्याच्या शंभूटोला व इतर दोन अश्या तिन गावात केला जात आहे. पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात काटेकोहळ्याचे उत्पादन घेतले जाणार आहे.धानाची कापणी झाल्यानंतर या काटेकोहळ्याची लागवड करण्यात येणार आहे. एकरात ३० ते ४० हजाराचा शुध्द नफा झाल्याचे सांगितले.

बचतगट गुणवत्तापूर्ण कार्य करीत असल्यामुळे त्यांना बँकेकडून सहज कर्ज दिले जाते. कुटुंब उभारणीसाठी व्यावसायीक ठरविण्यासाठी गट उपयुक्त ठरत आहेत.
- सुनील सोसे, जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ, गोंदिया.

Web Title: 68 thousand women financially from the savings group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.