आरटीईच्या पहिल्या फेरीत ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:52 PM2018-03-14T23:52:36+5:302018-03-14T23:52:36+5:30

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारी अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे.

700 students get admission in first round of RTE | आरटीईच्या पहिल्या फेरीत ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश

आरटीईच्या पहिल्या फेरीत ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश

Next
ठळक मुद्दे१३ ते २४ मार्च प्रवेश घेण्याची मुदत : जिल्ह्यातील १३७ पैकी १२२ शाळांची निवड

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारी अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील १०२९ विद्यार्थ्यांना आरटीई २५ टक्क्यात मोफत प्रवेश मिळावा यासाठी २ हजार ११२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहे. यासाठी पहिली सोडत १२ मार्च रोजी करण्यात आली. त्याची निवड १३ मार्च रोजी करून ७०० लोकांची निवड करण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना खाजगी विना अनुदानित नामांकित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे.
सत्र २०१७-१८ मध्ये अर्ज आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील १३७ शाळांनी बालकांना प्रवेश देण्याकरिता शाळांची नोंदणी केली आहे. १३७ शाळांमधील १०२९ जागेकरिता २ हजार ११२ पालकांनी आॅनलाईन प्रवेश नोंदणी केली आहे. सदर प्रक्रियेचा पहिला ड्रा (लॉटरी) १२ मार्च २०१८ रोजी दुपारी १२ वाजता सर्व शिक्षा अभियान कार्यालय, जि.प. गोंदिया खोली क्र.२०२ येथे करण्यात आला आहे. या सोडत नंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी १३ मार्च रोजी शासनाने जाहीर केली.
घरापासून शाळेचे अंतर एक किमीच्या आत असलेल्या ७०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. १३७ शाळांपैकी १२२ शाळांमधील रिक्त असलेल्या ९४८ जागांसाठी ही पहिली सोडत काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड झाली किंवा ज्यांची निवड झाली नाही अश्या सर्व पालकांना त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठविले आहेत. दुसरी फेरी नंतर सुरू होणार आहे.
दुसरी सोडत २५ मार्च नंतर
जिल्ह्यातील १०२९ विद्यार्थ्यांना आरटीई २५ टक्क्यात मोफत प्रवेश मिळावा १२ मार्च रोजी पहिला ड्रा करण्यात आला. यात ७०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना प्रवेश करण्याची मुदत २४ मार्च पर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवा यासाठी २५ मार्च नंतर दुसरी सोडत काढण्यात येणार आहे.

पालकांनी त्यांच्या मोबाईलवर आलेले संदेश मिटवू नये. आवश्यकतेनुसार २ रा व ३ रा ड्रा (लॉटरी) होणार आहे. १३ ते २४ मार्च २०१८ या दरम्यान पालकांनी सर्व कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे. वेळेच्या आत प्रवेश घेण्यात घ्यावा.
उल्हास नरड
प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया.

Web Title: 700 students get admission in first round of RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा