नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निर्मितीत अव्वल असलेल्या जिल्ह्यातील ८ शाळांची राज्यस्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापैकी सात शाळांना फाईव्ह तर एका शाळेला फोर स्टार मिळाला आहे. तर ३० शाळा सब कॅटेगिरीत आहेत.केंद्र सरकारचा स्वच्छ-सुंदर (स्मार्ट) शहरासोबतच स्वच्छ-सुंदर व मूलभूत सुविधांनी परिपूर्ण शाळेची निर्मिती करण्याचा उद्देश आहे. या परियोजनेंतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१७-१८ च्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी २६८ शाळांनी अर्ज करण्यात आले होते. यापैकी १५ शाळांची फाईव्ह स्टार व ७२ शाळांची फोर स्टार व १७६ शाळांची थ्री स्टारसाठी निवड करण्यात आली आहे.जि. प. शिक्षण विभागाकडून स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. आॅनलाईन पद्धतीने निवड व मुल्यांकन करण्यात आले. आॅनलाईन मूल्यांकनानंतर ७ शाळांना फाईव्ह स्टार, एक शाळेला फोर स्टार ग्रेड देण्यात आले. या सर्व शाळांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ३० शाळांना फाईव्ह स्टारची सब कॅटेगिरी देण्यात आली आहे. ५ क्षेत्रातील ३९ घटक तयार करण्यात आले होते. या शाळांचे मुल्यांकन करून मिळालेल्या गुणांमुळे श्रेणी तयार करण्यात आली. ९० ते १०० टक्के गुण घेणाऱ्या शाळांना फाईव्ह स्टारला सर्वोत्कृष्ट, ७५ ते ८९ टक्के गुण घेणारी शाळा फोर स्टार उत्कृष्ट, ५१ से ७४ टक्के घेणाºया शाळा थ्री स्टार उत्तम परंतु सुधार करण्याची गरज आहे.३५ ते ५० टक्के घेणाºया टू स्टार शाळांना साधारण सांगून सुधार करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. ३५ टक्यांपेक्षा कमी गुण घेणाºया शाळांना बरीच कसरत करावी लागेल.फाईव्ह स्टार शाळेसाठी पाच विषय आहेत. भरपूर पाणी, स्वच्छता, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वच्छतेसाठी हँडवॉश स्टेशन ज्यात नेहमी पाणी उपलब्ध असेल. लिक्वीड व साबण उपलब्ध असणे आवश्यक आहे. कचरा पेट्या, कचरा निर्मूलनाची व्यवस्था, वॉशच्या सुविधेची जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी कुटुंब व नागरिकांचा सहभाग यांचे मूल्यांकन करण्यात आले. या सर्व सुविधा उपलब्ध नसलेल्या शाळांना सब कॅटेगिरीत ठेवण्यात आले आहे.शहरी भागासाठी मेरिटोरियस व प्रोग्रेसिव्हराज्यस्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कारासाठी शहरी भागातून प्राथमिक विभागातून गोंदिया शहरातील सिव्हील लाईन्स येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट व तिरोडा येथील मेरिटोरियस पब्लिक स्कूलची निवड करण्यात आली आहे. मेरिटोरियसला फाईव्ह स्टार तर प्रोग्रेसिव्हला फोर स्टार मिळाले आहेत.ग्रामीण भागात रेहळी-जमाकुडो अव्वलग्रामीण क्षेत्रात प्राथमिक विभागातून देवरी तालुक्यातील ग्राम रेहळी येथील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विभागातून सालेकसा तालुक्यातील ग्राम जमाकुडो येथील शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. प्राथमिक विभागातून सोनेगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेने द्वितीय, खैरलांजी येथील जिल्हा परिषद प्राथमक शाळेने तृतीय तसेच माध्यमिक विभागात म्हैसुली येथील सोनियाबाई डी.आश्रमशाळेने द्वितीय, सडक-अर्जुनी तालुक्यातील कनेरी येथील डॉ.आर.के.हाईस्कूलने तृतीय क्रमांक पटकाविला. या शाळांना फाईव्ह स्टार देण्यात आले आहे.
स्वच्छ विद्यालयात पुरस्कारासाठी ८ शाळांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 9:24 PM
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निर्मितीत अव्वल असलेल्या जिल्ह्यातील ८ शाळांची राज्यस्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापैकी सात शाळांना फाईव्ह तर एका शाळेला फोर स्टार मिळाला आहे. तर ३० शाळा सब कॅटेगिरीत आहेत.
ठळक मुद्दे३० शाळा सब कॅटेगिरीत : सात शाळांना फाईव्ह व एकाला फोर स्टार