शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपच्या निर्णयाला आमचा पाठिंबा; आमच्या मनात किंतू-परंतू नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती
2
“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
3
आता 'या' मंदिर परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांना बंदी, कारण...
4
कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 
5
"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता
6
चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त
7
“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण
8
"आघाडी नाही, स्वबळावर निवडणूक लढवणार", दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत 'आप'ची मोठी घोषणा
9
रतन टाटांनी बिग बींकडे मागितले होते उसने पैसे! कारण ऐकून बॉलिवूडचा 'शहेनशाह' झाला थक्क
10
अमित शाहांची भेट घेतल्याच्या चर्चांवर रविंद्र चव्हाणांनी सोडलं मौन; म्हणाले, "या दोन दिवसांत..."
11
कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!
12
देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार?
13
'योगी बाबां'मुळे Google चे सीईओ सुंदर पिचाई अडचणीत? मुंबई कोर्टाने पाठवली नोटीस
14
“राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत
15
दिल्ली - मुंबई एक्स्प्रेस वेवर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला; एका मजुराचा मृत्यू, तिघे जखमी
16
LIC ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस; अवघ्या 5 एका दिवसात ₹60000 कोटींची कमाई...
17
आंतरराष्ट्रीय गायिका दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखचं गाणं वाजल्यावर काय घडलं? व्हिडीओ तुफान व्हायरल
18
Maharashtra Politics : मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांशिवाय कोणीही मान्य नाही; आरएसएसचा भाजपला संदेश, घोषणेच्या विलंबामुळे नाराजी
19
युगेंद्र पवारांनीही मतपडताळणीसाठी अर्ज केला; अजून काका अजित पवारांचे अभिनंदन केलेले नाही...
20
देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल!

अतिवेग अन् चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानेच अपघात; आरटीओच्या प्राथमिक चौकशीत पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 10:24 AM

परिवहन आयुक्त, पोलिसांना देणार अहवाल

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी डव्वाजवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात ११ प्रवासी ठार, तर २९ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) घडली. हा अपघात बसचा अधिक व बसवरील चालकाचे सुटलेले नियंत्रण यामुळेच झाल्याचे  नागपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी शनिवारी (दि.३०) घटनास्थळी भेट देऊन केलेल्या प्राथमिक  चौकशीत पुढे आले आहे. या अपघातास बस चालकच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भंडारा-गोंदिया शिवशाही बसचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला.. ही बस सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वावरून खजरीकडे जाताना चालकाने बसचा वेग वाढविला. दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नाने चालकाने अचानक ब्रेक लावला. परिणामी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. सुरुवातीला बस उजवीकडून  डावीकडे अशी होत उलटली. बसचा वेग अधिक असल्याने ती जवळपास २० फूट घासत गेल्याने हा अपघात घडला. बस अनियंत्रित होऊन त्यावरील बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात घडला आहे. या अपघातास बस चालकच जबाबदार असल्याचे  प्राथमिक चौकशीत पुढे आले असल्याचे नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शनिवारी खजरी येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

आयुक्तांकडे सादर करणार अहवाल

खजरी येथे झालेल्या शिवशाहीच्या अपघाताची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. आता सविस्तर अहवाल तयार करून तो परिवहन आयुक्त व पोलिस विभागाकडे सादर केला जाणार आहे.

शिवशाही बसच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शिवशाही बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब पुढे आली आहे.  काही बसची स्थिती अत्यंत बिकट आहे; पण यानंतरही त्या रस्त्यावर धावत आहे. परिणामी अपघातात वाढ होत असल्याची ओरड या विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांकडून होत आहे.