आठ कृषी केंद्रांवर कारवाई

By admin | Published: June 4, 2016 01:30 AM2016-06-04T01:30:21+5:302016-06-04T01:30:21+5:30

खरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री नियमानुसार

Action on eight Agricultural Centers | आठ कृषी केंद्रांवर कारवाई

आठ कृषी केंद्रांवर कारवाई

Next

८४ केंद्रांची तपासणी : १३.८४ लाखांच्या बियाणे विक्रीस मनाई

गोंदिया : खरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री नियमानुसार व्हावी यासाठी कृषी विभागाकडून कृषी केंद्रांची तपासणी सुरू आहे. त्यात आतापर्यंत ८४ केंद्रांची तपासणी भरारी पथकाने केली असून त्यापैकी ८ केंद्रांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे नियमबाह्यपणे ठेवलेले १३ लाख ८४ हजार रुपयांचे बियाणे विक्रीबंद करण्याचे आदेश देण्यात आले.
कृषी केंद्रांकडे साठा पुस्तक नसणे, दरफलक न लावणे, विक्री परवान्यात विक्री करीत असलेल्या कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश नसणे अशा विविध कारणांसाठी गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील ८ केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील ९५० क्विंटल धानाचे बियाणे विक्री करण्यास बंदी घालण्यात आली. याशिवाय ६ कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही कृषी केंद्र बंद होते. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली.
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी ४४ हजार ३०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी ७० टक्के बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Action on eight Agricultural Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.