देवरी येथे पुन्हा दोन कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:00 AM2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:30+5:30

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ८२५६ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २६० नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर ८००६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १०४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. १०५ नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. रॅपिड अँटीजेन टेस्टमधून ८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

Addition of two corona victims again at Deori | देवरी येथे पुन्हा दोन कोरोना बाधितांची भर

देवरी येथे पुन्हा दोन कोरोना बाधितांची भर

Next
ठळक मुद्देआतापर्यंत २२४ कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त : ८००६ स्वॅब नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन दिवसांपासून देवरी येथील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (दि.२८) आढळलेल्या एकूण चार कोरोना बाधितांमध्ये दोन देवरी येथील तर एक अर्जुनी मोरगाव आणि एक गोंदिया तालुक्यातील आहे.चार नवीन कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा २६० वर पोहचला आहे. एक कोरोना बाधित कोरोनामुक्त झाला.
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी आतापर्यंत २२४ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात २७ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी आढळलेल्या चार कोरोना बाधित रुग्णांमध्ये देवरी येथे दोन, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध भिवखिडकी येथील एक आणि गोंदियाजवळील फुलचुर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. मागील दोन दिवसांपासून देवरी येथील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने येथील एकूण बांधितांचा आकडा १४ वर पोहचला आहे. देवरी येथे कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत असल्याचे चित्र आहे. परिणामी देवरीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ८२५६ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २६० नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर ८००६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १०४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. १०५ नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. रॅपिड अँटीजेन टेस्टमधून ८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

१२४४ जण क्वारंटाईन
विविध संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात १८४ आणि होम क्वारंटाईन १०६० असे एकूण १२४४ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने १५६ चमू आणि ५४ सुपरवायझरची ३२ कंटेन्मेंट झोनसाठी नियुक्ती केली आहे.कंटेन्मेंट झोनमधील मधुमेह, उच्च रक्तदाब, आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आता ३२ कंटेन्मेंट झोन
कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. गोंदिया तालुक्यात मुंडीपार, फत्तेपूर, डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध, गोंदिया येथील कुंभारेनगर व सिव्हिल लाईन, सालेकसा तालुक्यातील पाथरी, पाउलदौना, शारदानगर, रामाटोला, देवरी तालुकयातील देवरी येथील वॉर्ड क्र मांक ८, वॉर्ड क्र मांक ९ आणि वॉर्ड क्र मांक १६, आखरीटोला व गरवारटोली, सडक अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड, खोडशिवनी व पाटेकुरा, गोरेगाव तालुक्यातील भडंगा, डव्वा व घोटी आणि तिरोडा तालुक्यातील तिरोडा सुभाष वॉर्ड, वीर वामनराव चौक, भूतनाथ वार्ड, न्यू सुभाष वॉर्ड, किल्ला वॉर्ड, नेहरू वॉर्ड, गराडा, बेरडीपार, बेलाटी खुर्द आदींचा समावेश आहे.
 

Web Title: Addition of two corona victims again at Deori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.