कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सर्व ग्रामपंचायत सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 AM2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जग भयभीत झाले आहे. कोरोना हे आजघडीला जगावर आलेले मोठे संकट ...

All Gram Panchayats ready for fight against Corona | कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सर्व ग्रामपंचायत सज्ज

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सर्व ग्रामपंचायत सज्ज

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायत, विविध उपक्रमातून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जग भयभीत झाले आहे. कोरोना हे आजघडीला जगावर आलेले मोठे संकट आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन एकजुटीने प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणा व पोलीस विभागासह अन्य यंत्रणांना सोबत घेऊन दिवस-रात्र काम करीत आहे. यातच जिल्ह्यातील ग्रामपंचायतही यासाठी सज्ज आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जिल्हा परिषद काळजी घेत असून कोरोना विषाणूचा ग्रामीण भागात मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ५४५ ग्रामपंचायती सज्ज आहेत.
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये हँॅडवॉश स्टेशन सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी हात कशाप्रकारे धुतले पाहिजे याची तांत्रिक माहिती देणारे बॅनर या सर्व ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात आले आहे. सचित्र बॅनरवरून हात कशाप्रकारे धुवावे याची माहिती ग्रामस्थांना मिळत आहे. तसेच कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे याबाबत जागृती करणारे बॅनर्स सुद्धा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवरील माहिती वाचून नागरिक दक्ष होत आहेत. सोबत इतरांना सुद्धा कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत माहिती देत त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे.

बाहेरून आलेल्या व्यक्तींचे अलगीकरण
कोरोना विषाणूला प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून ‘लॉकडाऊन’च्या काळात बाहेर राज्य व जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले गावातील व्यक्ती परत गावात आल्यास तसेच विदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती गावातील नागरिकांनी सरपंच व तहसीलदारांना देऊन त्यांची आरोग्य तपासणी करून घेतली आहे. आरोग्य विभागाच्या सल्ल्याने आवश्यकता असल्यास त्यांचे घरीच अलगीकरण देखील करण्यात आले असून त्यांच्यावर ग्रामस्थांचे लक्ष आहे. ग्रामीण भागात कोरोनापासून बचावासाठी दक्षता घेतली जात आहे.

ग्रामपंचायतकडून फवारणी
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जंतुनाशकाची फवारणी करण्यात आल्यामुळे कोरोनासह अन्य आजारांना प्रतिबंध घालण्यात मदत झाली आहे. बहुतांश ग्रामपंचायतींनी नाल्यांची साफसफाई करवून घेतली आहे. त्यामुळे रोगराईस प्रतिबंध करण्यास हातभार लागत आहे. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेतल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे.

Web Title: All Gram Panchayats ready for fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.