अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील आमदार मंडळी राजकारणात आणि विकासाची कामे करण्यात कितीही व्यस्त असली तरी ते वेळात वेळ काढून आपल्या शेतीकडे लक्ष देतात. आधुनिक तंत्रज्ञान तसेच सेंद्रिय शेतीचे महत्त्व ओळखत ते या पद्धतीची शेती सुद्धा करीत आहे. आमदार विजय रहांगडाले यांनी धानाच्या शेतीसह आंबा आणि पपईची फळबाग सुद्धा फुलविली आहे. ते स्वत: शेतीत रस घेऊन मार्गदर्शन करतात. आ.मनाेहर चंद्रिकापुरे हे राजकारणात येण्यापूर्वी कृषी विभागातच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांना शेतीविषयी चांगले ज्ञान असून ते या ज्ञानाचा उपयोग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करतात. तर आ. विनोद अग्रवाल आणि सहषराम कोरोटे हे सुद्धा शेती करतात.
सेंद्रिय शेतीसह फुलविली फळबाग - जिल्ह्यातील चारही आमदारांकडे शेती असून, ते आधुनिक तसेच पांरपरिक शेतीदेखील करतात. आ. विजय रहांगडाले व सहषराम कोरोटे यांनी सुध्दा आपल्या शेतात फळबाग फुलविली आहे. तर काही क्षेत्रावर त्यांनी सेंद्रिय शेतीसुध्दा केली आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन - आ. मनोहर चंद्रिकापुरे हे राजकारणात येण्यापूर्वी कृषी विभागात कार्यरत होते, त्यामुळे त्यांना शेतीविषयी सखोल ज्ञान आहे. ते या ज्ञानाचा उपयोग अजूनही शेतकऱ्यांसाठी करतात. छोट्या-मोठ्या कार्यक्रमात ते आवर्जून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. याची शेतकऱ्यांना सुध्दा उपयोग होतो.