कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शैक्षणिक सत्र संपत येत असताना नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जोडे व मोजे वाटप करण्यात आले. त्यामुळे नगर परिषद शिक्षण विभागाच्या या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, जोड व मोजे यांची मागील काही महिन्यांची मागणी असताना पुरवठादाराला उशिरा जाग आल्याचे चित्र आहे. पुरवठादाराने आपली बाजू सावरण्यासाठी तडकाफडकी जोडे-मोजे वाटप केल्याचे बोलल्या जाते.नगर परिषदेच्या कारभाराबाबत सर्वांनाच चांगल्याने ठाऊक आहे. आवश्यक त्या कामाकडे दुर्लक्ष व अनावश्यक वस्तूंसाठी उधळण ही नगर परिषद प्रशासनाची आता विशेषता होवू लागली आहे. जून महिन्यात शाळा सुरू झाल्या. त्यात यंदा कॉन्व्हेंटची भर पडली.कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहीत्य पुरविण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांची पुर्तता करण्यात नगर परिषद शिक्षण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला. दोन जोड गणवेश देण्याचे आश्वासन देऊन एक जोड गणवेशावरच भागविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांत रोष व्याप्त आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, सत्राच्या शेवटी आता विद्यार्थ्यांना जोडे-मोजे वाटप करण्याचे काम सुरू आहे. आता जेमतेम दोन महिने शाळांना उरले असून परीक्षांचा काळ सुरू झाला आहे.अशात कोणता विचार करून विद्यार्थ्यांना जोडे-मोजे वाटप केले जात आहे हे कळेनासे आहे. या प्रकारामुळे मात्र नगर परिषद वर्तुळासह खुद्द विद्यार्थी व त्यांचे पालक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.नगर परिषद पदाधिकाºयांच्या बसण्यासाठी तडकाफडकी त्यांच्या कॅबीनचे सौंदर्यीकरण करण्यात आले. तर दुसरीकडे मात्र चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या साहित्यांच्या बाबतीत एवढा उशीर करणे हे नगर परिषदेच्या सुरळीत प्रशासनाचे उदाहरण ठरत असल्याचे बोलले जात आहे.२.८६ लाखांचे साहित्यनगर परिषदेने कॉव्हेंटमधील २५० व इयत्ता पहिली ते चौथीच्या ४०० अशा एकूण ६५० विद्यार्थ्यांसाठी जोडे-मोजे पुरवठ्याची मागणी केली होती. हे काम रूद्र जनरल सप्लायर्स या फर्मला देण्यात आले. नगर परिषदेने त्यांना ४ आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पत्र देऊन साहीत्य पुरविण्याची मागणीही केली होती. मात्र पुरवठादाराने साहीत्य वेळेत पुरविले नाही. मध्यंतरी हा प्रकार प्रतिनिधींच्या नजरेत आल्याने तडकाफडकी पुरवठादाराने २४ जानेवारी रोजी साहीत्य पुरविल्याची माहिती आहे. येथे हे साहीत्य पुरविणारा पुरवठादार नगर परिषदेतील प्रमुख पदाधिकाºयांचा जवळचा व्यक्ती असल्याची चर्चा नगर परिषदेच्या वर्तुळात आहे. यात पुरवठादाराने ४० रूपये दराने मोजे तर ४०० रूपये दराने जोडे पुरविल्याची माहिती असून याबाबत सर्वांनाच आश्चर्य होत आहे.
सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांना जोडे-मोजे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:57 PM
शैक्षणिक सत्र संपत येत असताना नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जोडे व मोजे वाटप करण्यात आले. त्यामुळे नगर परिषद शिक्षण विभागाच्या या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठळक मुद्देशिक्षण विभागाचा अजब कारभार : पुरवठादाराला आली उशिरा जाग