लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम केले. मागील वर्षी राज्य सरकार कोरोनामुळे आर्थिक संकटात होती. तरीही धान उत्पादकांसाठी १४०० कोटी रुपयांच्या बोनसला मंजुरी देण्यात आली. या वर्षीही २००० कोटी रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना स्वरूपात मिळणार आहेत. जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. तालुक्यातील ग्राम गोवारीटोला (निंबा) येथील भास्कर मेंढे यांच्या निवासस्थानी प्रांगणात शुक्रवारी (दि.१२) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, खुशाल बोपचे, केवल बघेले, रविकांत बोपचे, रामू हरिणखेडे, सोमेश रहांगडाले, के. के. डोंगरे, बाबा बहेकार, बाबा बोपचे, भास्कर मेंढे, कल्पना बहेकार, अनिता तुरकर, देवचंद सोनवाने, लालचंद चव्हाण, सुरेंद्र रहांगडाले, चौकलाल येडे, गणेश पारधी, आनंद बडोले उपस्थित होते. याप्रसंगी खासदार पटेल यांनी परिसरातील नागरिक व पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच स्थानिक समस्यांवर संवाद साधला. तसेच येत्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे असे सांगत महाविकास आघाडीने केलेले कार्य जनते पर्यंत पोहचविण्यासाठी सक्रीयतेे कार्य करा असे सांगीतले. याप्रसंगी खासदार पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.