नक्षलवाद्यांनी २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल सप्ताह पुकारून अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांची लोकविरोधी, शासन विरोधी कृत्ये हाणून पाडण्यासाठी आदिवासी बांधव जागृत होण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि उपविभागीय अधिकारी जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात येथील ठाणेदार संदीप इंगळे यांनी पोस्टर तयार करून त्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी बांधवांनो कुठवर सहन करणार नक्षलवाद्यांचा हा अत्याचार, करू नायनाट नक्षलवादाचा मार्ग धरू विकासाचा, आता करूया एकच निर्धार नक्षलवादाला करू या कायमचा हद्दपार’ अशी पोस्टर तयार करून अल्पवयीन मुलांना पळवून नेणे, अल्पवयीन मुलांकडून अवजड कामे करवून घेणे, सामान्य नागरिकांना धरून स्वत:चा बचाव करणे, महिलांवर अत्याचार करणे, मध्यस्थांच्या मदतीने खंडणी वसूल करणे, सामान्य निष्पाप नागरिकांची हत्या करून खबरी घोषीत करणे इत्यादी कृत्ये पोस्टरच्या माध्यमातून चित्रित करून केशोरी पोलीस ठाणया अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात लावून जनजागृती अभियान सुरू केले आहे.
नक्षलविरोधी पोस्टर लावून जनजागृती अभियान सुरू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:30 AM