बँकांनी महिलांना कर्ज उपलब्ध करून द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:34 PM2018-06-09T22:34:43+5:302018-06-09T22:34:43+5:30

आज महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. या संघटनेत महिला आर्थिक विकास महामंडळाचा (माविम) चा मोलाचा वाट आहे. माविममुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असून त्या उद्योजक बनत आहेत.

Banks should provide loans to women | बँकांनी महिलांना कर्ज उपलब्ध करून द्यावे

बँकांनी महिलांना कर्ज उपलब्ध करून द्यावे

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : मुद्रा योजना महिला मेळावा, महिला बचत गटाच्या सदस्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आज महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. या संघटनेत महिला आर्थिक विकास महामंडळाचा (माविम) चा मोलाचा वाट आहे. माविममुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असून त्या उद्योजक बनत आहेत. आज महिलांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनविण्यासाठी बँकांनी मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती, नियोजन विभाग व आधार लोकसंचालित साधन केंद्र सडक-अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याच आयोजन येथील तेजस्वीनी लॉनमध्ये करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सडक-अर्जुनी पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे, प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती राजेश कठाणे, जि.प. सदस्य शीला चव्हाण, पंचायत समिती सदस्य कविता रंगारी, मंजूर डोंगरवार, माजी पंचायत समिती सभापती पद्मा परतेकी, तहसीलदार विठ्ठल परळीकर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बी. एस. शिवणकर, बँक आॅफ इंडियाचे वित्तीय समावेशक रविंद्र पहिरे, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, लक्ष्मीकांत धनगाये, शामराव शिवणकर, जिजा पाथोडे उपस्थित होते.
बडोले म्हणाले, जिल्ह्यातील महिला या उद्योजक व्हाव्यात या दृष्टीने माविम काम करीत आहे. जिल्ह्यातील बचतगटांना माविमने २८ कोटी रुपयांचे कर्ज मागील वर्षात उपलब्ध करून दिले. मुद्रा योजनेच्या माध्यमातून बचतगटातील महिलांना वैयक्तीकरित्या कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. आत्मसन्मान योजनेच्या शुभारंभाप्रसंगी २५ महिलांना वाती तयार करण्याच्या मशीन उपलब्ध करून दिले.
यामुळे जवळपास १०० महिलांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगितले. या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते फुलवात तयार करण्याºया मशीनच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.तालुक्यातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाची प्रदर्शन व विक्रीची पाहणी केली.
प्रेरणा पुस्तिकाचे विमोचन करण्यात आले. मुद्रा योजनेंअतर्गत शिशू गटात कर्ज मंजूर झालेल्या अमीता अग्रवाल, सविता कटरे, मीनाक्षी बोरकर, सुशिला लाडे यांच्यासह १० जणांना कर्ज प्रकरणाचे मंजूरी पत्र देण्यात आले.
डोंगरगाव येथील यशस्वी महिला बचत गट, सडक - अर्जुनी येथील एकता बचत गट, कन्हारपायली येथील यशोधरा बचत गट, संत गाडगेबाबा ग्रामसंस्था पळसगाव, निर्मल ग्रामसंस्था उशिखेडा, राणीलक्ष्मी ग्रामसंस्था बक्की यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रोजेक्ट आत्मसन्मान योजनेंतर्गत वैशाली डोये, कविता शेन्डे, मीना रहांगडाले, नीता पटले, हेमा नंदेश्वर यांच्यासह २५ बचतगटातील महिलांना फुलवात तयार करणाºया मशीनचे वाटप करण्यात आले. शिवणकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, संचालन शालीनी साखरे तर आभार व्यवस्थापक पालींद्रा अंबादे यांनी मानले.

साधन केंद्राला १० लाखांचा निधी
४बचतगटांनी चांगल्या वस्तूचे उत्पादन केले तर त्यांच्या वस्तूची विक्र ी करु न देण्याचे कामही करण्यात येईल. सडक-अर्जुनी येथील माविमच्या आधार लोकसंचालित साधन केंद्राला वस्तू विक्री केंद्र उभारण्यासाठी १० लाख रूपये देण्यात येणार आहे. यासाठी जागा देखील उपलब्ध करून देण्यात येणार.
गुणवंताचा सत्कार
४वनश्री बचतगटातील सभासद रेखा कटरे यांचा मुलगा योगेश कटरे हा इयत्ता १२ वीमध्ये ९३ टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे सडक-अर्जुनी येथील शाखा व्यवस्थापक पंचबुध्दे यांनी मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना कर्ज दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Web Title: Banks should provide loans to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.