ऑनलाईन लोकमतगोंदिया : केंद्र सरकारने सर्वच बँकामधील ग्राहकांचे खाते आधारकार्डसह ३१ मार्चपर्यंत लिंक करण्याचे आदेश दिले आहे. आधार लिंक करण्याची मुदत संपत येत असल्याने ग्राहकांची बँकामध्ये गर्दी वाढली आहे. आधीच आधार लिंक प्रक्रियेमुळे हैराण असलेल्या ग्राहकांना बँक कर्मचाºयांच्या असभ्य वागणुकीला सामोरे जावे लागत असल्याने ग्राहकांमध्ये रोष व्याप्त आहे.विविध शासकीय योजनाचे अनुदान, पेशंन, कर्मचाऱ्यांचे वेतन स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये जमा होते. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांची संख्या निश्चितच अधिक आहे. त्यातच केंद्र सरकारने सर्व बँक खातेदारांचे खाते आधारकार्डसह ३१ मार्चपर्यंत लिंक करण्याचे निर्देश दिले आहे. या तारखेपर्यंत खाते आधारकार्डसह लिंक न करणाऱ्या ग्राहकांचे खाते बंद करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. खाते बंद होण्याच्या भीतीने मागील दोन तीन दिवसांपासून बँकेमध्ये आधारकार्ड लिंक करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता बँकेने पर्यायी व्यवस्था अथवा ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे अपेक्षीत आहे. पण येथील अग्रेसन मार्गावरील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मंगळवारी (दि.१३) खाते आधार लिंक करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना बँक कर्मचाऱ्यांनी असभ्य वागणूक दिली. ऐवढेच नव्हे तर अर्ज फेकून दिल्याचा आरोप ग्राहकांनी केली. बँकेत घडलेल्या यासर्व प्रकाराची तक्रार ग्राहकांनी लोकमत कार्यालय गाठून केली. तसेच ग्राहकांना योग्य वागणूक न देणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.स्वतंत्र कक्ष सुरु कराग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता आधारकार्ड लिंक करण्यासाठी बँकेत काही दिवसांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात यावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणीआधारकार्ड लिंक करणाऱ्यांसाठी सर्वच बँकामध्ये सध्या ग्राहकांची गर्दी आहे. मात्र स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत सर्वाधिक गर्दी असून यात अनेक पेशंनधारक ग्राहकांचा समावेश आहे. मात्र बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना योग्य वागणूक दिली जात नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यासर्व प्रकाराची दखल घेवून बँक व्यवस्थापनाला योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.
बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना असभ्य वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:40 AM
केंद्र सरकारने सर्वच बँकामधील ग्राहकांचे खाते आधारकार्डसह ३१ मार्चपर्यंत लिंक करण्याचे आदेश दिले आहे. आधार लिंक करण्याची मुदत संपत येत असल्याने ग्राहकांची बँकामध्ये गर्दी वाढली आहे.
ठळक मुद्देखाते बंद होण्याच्या भीतीने वाढली गर्दी : ग्राहकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार