घरकुलच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची होताहे परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:20+5:30

प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळून गोरगरीब सामान्य जनतेला हक्काचे टूमदार घरकुल मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजनेंतर्गत निवड झालेल्या गरजू लाभार्थ्यांना एक लाखांच्यावर अनुदानाची राशी दिली जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे निर्माणाधिन काम करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र असा विभाग आहे.

Beneficiaries can afford the house installment | घरकुलच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची होताहे परवड

घरकुलच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची होताहे परवड

Next
ठळक मुद्देसबंधितांचा कामचुकारपणा : टूमदार घरकुलाचे स्वप्न पूर्ण कसे होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : शासनाच्या विविध योजनांतर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. निवड झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना पंचायत समिती स्तरावरुन कामाचा बांधकाम प्रगती अहवाल पाहून टप्याटप्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची राशी जमा केली जाते. परंतु अर्जुनी-मोरगाव पंचायत समितीतील सबंधीतांच्या कामचुकार प्रणालीने अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास कमालीचा विलंब होत आहे. यामुळे त्यांना कामधंदे सोडून पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र आहे.
प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळून गोरगरीब सामान्य जनतेला हक्काचे टूमदार घरकुल मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजनेंतर्गत निवड झालेल्या गरजू लाभार्थ्यांना एक लाखांच्यावर अनुदानाची राशी दिली जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे निर्माणाधिन काम करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र असा विभाग आहे. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, स्थापत्य अभियंता यांच्यासह संगणक हाताळणाऱ्या अनुभवी प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांचा लवाजमा घरकुल निर्माणाधीन कार्यासाठी आहे. आवश्यक ती यंत्रणा कार्यरत राहून देखील तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची अनुदानाच्या राशीसाठी कमालीची परवड होताना दिसून येत आहे.
आजघडीला प्रधानमंत्री आवास योजनेचाच निधी उपलब्ध असल्याचे सांगीतले जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ता मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधितांच्या कामचुकार प्रणालीचा फटका मात्र सामान्य लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. घरकुल निर्माणाधिन बांधकाम नियमित सुरु असताना सुद्धा वेळेच्या आत बिल अपलोड केले जात नाही.
पैसाच नसल्याने गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम बंद ठेवावे लागते. आजघडीला वेळेच्या आत अनुदानाचे हप्ते संबंधीत लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर जमा होत नाही अशी कैफीयत बऱ्याच लाभार्थ्यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ मांडली.
घरकुल कामावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त असलेल्यांची गाऱ्हाणी वरिष्ठांच्या नजरेसमोर आणून देण्यात आली. परंतु संबंधीतांकडून सुधारणा झालेली दिसत नाही. अनुदानाची राशी देण्यात विलंब होत असल्याने लाभार्थ्यांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार? याचा विचार करणे गरजेचे आहे.

Web Title: Beneficiaries can afford the house installment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.