लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतंर्गत पीक विमा काढणाºया शेतकऱ्यांना परतावाच मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या एकाही शेतकऱ्याला पीक विमा योजनेचा लाभ न मिळाल्याची बाब पुढे आली. त्यामुळे पीक विम्याचा लाभ केवळ विमा कंपन्यांनाच होत आहे.अतिवृष्टी, दुष्काळ आणि किडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा भरुन निघत नाही. परिणामी शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. यातूनच आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्थकारात. शेतकºयांवर ही वेळ येऊ नये यासाठी शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पिकांना संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र विमा कंपन्याच्या चुकीच्या धोरणामुळे याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ४१ हजार ६४७ शेतकऱ्यांनी तर ९४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा हप्त्यापोटी यासर्व शेतकऱ्यांनी २ कोटी २१ लाख रुपये विमा कंपन्याकडे भरले. मात्र पीक विमा काढलेल्या एकाही शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळाला नाही. याला कृषी विभागाने सुध्दा दुजारो दिला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी विम्या कंपन्यानी एक नियमावली तयारी केली आहे. यासाठी त्यांनी महसूल मंडळात हवामान माहिती केंद्र उभारले आहे. या केंद्रावर होणाऱ्या नोंदणीनुसार विमा कंपन्या परतावा देतात. पण गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न झाल्याचे सांगत पीक विम्याचा परतावा देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
पीक विम्याचा लाभ विमा कंपन्यांनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 10:25 PM
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतंर्गत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना परतावाच मिळत नसल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देमागील वर्षी एकाही शेतकऱ्याला लाभ नाही : ४१ हजार ७४० शेतकऱ्यांनी काढला होता विमा