सडक-अर्जुनी : सौंदड येथील माळी समाजाचे भरत परसराम देशकर यांचा मृतदेह ८ मार्च रोजी चंद्रपूर ते गोंदिया मार्गावर सौंदडच्या बाजाराजवळ रेल्वेच्या पटरीवर आढळलेला दिसून आला. त्यामुळे भरत देशकर यांचा रेल्वे अपघात नसून खून झाला आहे. याकरीता सौंदडच्या माळी समाजाकडून शुक्रवारी (दि.१८) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार व्ही.एम.परळीकर यांना निवेदन देण्यात आले. मृतक भरत परसराम देशकर यांच्या आईने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, त्यांच्या मोहल्यातील नितेश भाऊराव ब्राम्हणकर व मंगेश चैतराम ब्राम्हणकर यांनी जुन्या भांडणावरून माझ्या मुलाचा खून केला व त्याचे प्रेत रेल्वेपटरीवर फेकण्यात आले. लोकांना असे वाटावे की, त्यांनी आत्महत्या केली अशाप्रकारे दाखविण्यात आले. त्यामुळे या संदर्भात योग्य चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी याकरिता पोलीस अधीक्षक आणि डुग्गीपारचे पोलीस निरिक्षक यांना तक्रार दाखल करण्यात आली. तर सौंदडचे पोलीस पाटील आत्माराम ब्राम्हणकर हे देखील गावातील लोकांची दिशाभूल करतात असेही तक्रारीत सांगण्यात आले आहे. सदर खुनाची योग्य ती चौकशी करावी याकरिता सौंदड येथील माळी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चामध्ये सहभागी असलेल्यामध्ये पं.स.सदस्य गायत्री इरले, धनलाल नागरीकर, शिवसेना प्रमुख सदाशिव विठ्ठले, आंबेडकर चळवळीचे नेते मदन साखरे, माळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विष्णू नागरीकर, गोंदियाचे अनिल डोंगरवार, ग्रा.पं.सदस्य नंदकिशोर डोंगरवार, ग्रा.पं.सदस्य संतोष सावरकर, ग्रा.पं.सदस्य सुखदेव श्रीसागर, प्रभुजी विठ्ठले, प्रकाश तुमाने, मंजू इरले, माळी समाज तालुका अध्यक्ष प्रिती गोटेफोडे, देवराव नगरकर, सुनिल इरले, मृतकाही आई शांताबाई देशकर, पत्नी भारती देशकर, भाऊ विनोद परसराम देशकर, प्रमोद देशकर यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची नोंद करण्यात आली असून मृतकाचे प्रेत रेल्वे पटरीवर आढळून आल्यामुळे आणि मृतकाच्या डोक्याला मार असल्याने, परंतु शरीर कटल्या कारणाने वैद्यकीय अहवाल मागविण्यात आला आहे. पोलीस मृतकाचा खून झाला असावा याच दृष्टीने तपास करीत आहे. राजकुमार केंद्रे , ठाणेदार, डुग्गीपार पोलीस स्टेशन
भरत देशकर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून खूनच?
By admin | Published: March 21, 2016 1:34 AM