सर्वात मोठा घोटाळा म्हणजे ‘क्लिन चिट’ घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:09+5:30

राज्यात मागील पाच वर्षांत उद्योग धंदे आले नसताना आणि विकास कामे झाली नसताना राज्यावरील कर्जात मागील पाच २ लाख १५ हजार रुपये कोटी रुपयांनी वाढ कशी झाली. जेव्हा की मागील ५४ वर्षांत विविध विकास कामे करुन सुध्दा महाराष्ट्रावर केवळ २ लाख ८५ हजार कोटी रुपयांच कर्ज होते.

The biggest scam is the 'Clean Chit' scam | सर्वात मोठा घोटाळा म्हणजे ‘क्लिन चिट’ घोटाळा

सर्वात मोठा घोटाळा म्हणजे ‘क्लिन चिट’ घोटाळा

Next
ठळक मुद्देअमोल मिटकरी : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा, यात्रेचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्रातील विद्यमान भाजप सरकार पारदर्शक असल्याचा दावा मुख्यमंत्री आणि या पक्षाचे मंत्री करीत आहेत. मात्र याच सरकारच्या कार्यकाळातील १६ मत्र्यांनी ९० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. हा घोटाळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उघडकीस आणला होता. मात्र याची साधी चौकशी न करता मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना क्लिन चिट दिली. या सरकारच्या कुठल्याही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले की त्याची चौकशी न करता त्यांना क्लिन चिट दिली जाते. त्यामुळे महाराष्ट्रांतील सर्वात मोठा कोणता घोटाळा असेल तर तो क्लिन चिट घोटाळा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केली.
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली असून या यात्रेचे मंगळवारी (दि.१०) जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे आगमन झाले.या वेळी आयोजित सभेत संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकनकर, खा.प्रफुल्ल पटेल, खा.अमोल कोल्हे, आ.प्रकाश गजभिये, ओबीसी सेलचे ईश्वर बाळबुध्दे, महेबुब शेख, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापूरे उपस्थित होते.अमोल मिटकरी म्हणाले, राज्यात मागील पाच वर्षांत उद्योग धंदे आले नसताना आणि विकास कामे झाली नसताना राज्यावरील कर्जात मागील पाच २ लाख १५ हजार रुपये कोटी रुपयांनी वाढ कशी झाली. जेव्हा की मागील ५४ वर्षांत विविध विकास कामे करुन सुध्दा महाराष्ट्रावर केवळ २ लाख ८५ हजार कोटी रुपयांच कर्ज होते. मग भाजप सरकारने पाच वर्षांत कुठली विकास कामे केली नसताना हे कर्ज वाढले कसे आणि ऐवढा पैसा नेमका गेला कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव,महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना,बेरोजगारांच्या हाताला काम,महागाईवर नियंत्रण,शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तता केली उलट जतनेशी फिक्सींग केली. शेतकरी सन्मान योजनेच्या नावावर त्यांना ६ हजार रुपये वर्षाकाठी म्हणजे दररोज १७ रुपये मदत देऊन त्यांचा सन्मान नव्हे तर अपमान करण्याचे काम केले. विद्यमान मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याप्रकरणी सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होती. मग आता त्यांच्याच सरकारच्या कार्यकाळात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून आता याप्रकरणी कुणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे असा सवालही मिटकरी यांनी केला. निवडणुकी दरम्यान जनतेनी भावनिक मुद्यांच्या आहारी न जाता योग्य कोण ओळखून निर्णय घेण्याचा सल्ला दिला. खा. अमोल कोल्हे म्हणाले सध्या महाराष्ट्रात तीन राजकीय पक्षांच्या यात्रा सुरू आहेत.त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षांत राज्यात न केलेली कामे आणि मी परत येणार हे सांगण्यासाठी आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा ही सवसामान्याच्या रयतेचे राज्य आणण्यासाठी काढली असल्याचे सांगितले. राज्यातील भाजप सरकारने मागील पाच वर्षांत केवळ जनतेच्या अपेक्षांचा भंगच केला. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याची टिका कोल्हे यांनी केली.तरूणांना केवळ मेगा भरतीचे स्वप्न दाखवून त्यांचा भवितव्याशी खेळ करणाºया सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले.
हा सावरकरांचा अपमान नाही का?
ईस्त्रोची चांद्रायाण हे उपग्रह मोहीम फसल्याने भिडे गुरूजी यांनी एकादशीला हे यान पाठविले असती तर मोहीम यशस्वी झाली असती असे सांगत आहे. मग हा विज्ञानवादी विचार मानणाऱ्या स्वातंत्र्यविर वि.दा.सावरकर, स्वामी विवेकानंद यांचा अपमान नव्हे का असा सवाल खा.अमोल कोल्हे यांनी केला.
भविष्याचा विचार करुन निर्णय घ्या-प्रफुल्ल पटेल
मागील पाच वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नाही. जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले. मात्र त्यांनी हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणाऱ्या भेल प्रकल्पाबाबत काहीच बोलले आहे. तर शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव देण्याचे आश्वासन सुध्दा फोल ठरले.त्यामुळे अशा आश्वासनबाज सरकारपासून सावध राहून आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करुन मतदान करण्याचे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले.
गोरगरीबांच्या अश्रूंची किमत मोजावी लागेल
शेतमालाला योग्य हमीभाव नाही, महिला सुरक्षीत नाहीत, दररोज अत्याचाराच्या घटना वाढत आहे. रोजगाराअभावी बेरोजगारांची भटकंती सुरू आहे. तर वाढत्या महागाईमुळे गोरगरिब जनता होरपळून निघत भाजप सरकारच्या धोरणामुळे अश्रू ढाळत आहे. त्यामुळे या सरकारला गोरगरीबांच्या अश्रूंची किमत मोजवी लागेल असा अशी टिका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकनकर यांनी केले.
रामदेवबाबांच्या कापसाला लाख रुपये
काबाळकष्ट आणि रक्ताचे पाणी करुन शेतात वर्षभर राबल्यानंतर शेतकऱ्यांच्या कापसाला केवळ ४ हजार ५०० रुपये भाव दिला जातो. तर पतंजलीच्या रामदेवबाबांच्या कापसला १ लाख ६० हजार रुपये भाव दिला जातो. मग भाजप सरकार नेमके कोणाच्या हिताचे आहे जनतेनीच ठरावे अशी टिका अमोल मिटकरी यांनी केली.

Web Title: The biggest scam is the 'Clean Chit' scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.