नक्षल्यांकडून जनतेला भूलथापा

By admin | Published: January 15, 2016 02:39 AM2016-01-15T02:39:35+5:302016-01-15T02:39:35+5:30

नक्षलवादी हे ग्रामीण लोकांच्या विकासगंगेतील अडथळे असून ते जनसामान्यांना भूलथापा देतात.

Blame the masses by naxalites | नक्षल्यांकडून जनतेला भूलथापा

नक्षल्यांकडून जनतेला भूलथापा

Next

नक्षलविरोधी पत्रके वाटप : गवर्रा येथे जनजागरण मेळाव्याची सांगता
केशोरी : नक्षलवादी हे ग्रामीण लोकांच्या विकासगंगेतील अडथळे असून ते जनसामान्यांना भूलथापा देतात. शासकीय लाभांच्या योजनापासून लोकांना दूर ठेवण्याच्या प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच जनजागरण या शब्दाची निर्मिती झाली. जनजागरणाच्या माध्यमातून लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस ठाण्याच्या वतीने गवर्रा येथील मैदानावर आयोजित जनजागरण मेळाव्यात डॉ.पखाले अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी तहसीलदार कल्याणकुमार डहाट, नायब तहसीलदार सचिन पाटील, गावडे, खंडविकास अधिकारी नारायण जमेवार, कृषी अधिकारी तुमडाम, रामटेके, एकात्मिक बालविकास अधिकारी सुमिता दमाहे, प्रदीप कश्यप, डॉ. पिंकू मंडल, नक्षलसेल पोलीस निरीक्षक तटकरे, पोलीस उपनिरीक्षक शेख प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आपल्या पथकासह उपस्थित राहून स्टॉल्सच्या माध्यमातून नक्षलविरोधी पत्रके वाटप करून नक्षल आत्मसमर्पण योजनांची माहिती दिली.
यात दोन दिवस कबड्डी स्पर्धा, १०० मीटर धावणे, संगीत खुर्ची, चमना गोळी, रांगोळी स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. प्राविण्यप्राप्त करणाऱ्या सर्व वयोगटातील स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले. मेळाव्याप्रसंगी आरोग्य विभागाद्वारे जननी सुरक्षा योजनेंतर्गत नऊ लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. थेल्स पी योजनेंतर्गत दोन इंजिन संच तथा बैलजोडी अनुदानापायी दोन लाभार्थ्यांना प्रत्येकी ३० हजार रुपये प्रदान करण्यात आले. अनुसूचित जाती जमातीच्या ४९ व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नऊ व्यक्तींना अधिवास प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तर ४४ व्यक्तींना आधारकार्ड नोंदणी करून वाटप करण्यात आले. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र गोंदियाकडून २३ बेरोजगार युवकांची व्यवसाय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.
समारोप अध्यक्षीय भाषणामधून अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी उपस्थित जनतेला नक्षलविरोधी माहिती, स्त्रियासंबधी कायदे, हक्क आणि शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, हे विशेष.
संचालन अनिल लाडे यांनी केले. आभार सहायक पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांनी मानले. मेळाव्यासाठी ठाणेदार प्रशांत भस्मे, सहायक पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे, संदीप गोसावी, गणेश नावकार, एओपी प्रभारी गोरक्ष खरड, प्रकाश कांबळे तथा पोलीस कर्मचाऱ्यांसह गवर्रा गार्डनपूर येथील नागरिकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Blame the masses by naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.