ब्लॉकमुळे गोंदिया-नागपूर-गोंदिया रेल्वे प्रवास बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 09:32 PM2018-06-10T21:32:42+5:302018-06-10T21:32:42+5:30
नागपूर रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या काचेवानी, गंगाझरी व गोंदिया रेल्वे स्थानकांमध्ये आॅटोसिग्नलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य ११ ते १३ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंदिया-नागपूर-गोंदिया रेल्वे प्रवास बाधित होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागपूर रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या काचेवानी, गंगाझरी व गोंदिया रेल्वे स्थानकांमध्ये आॅटोसिग्नलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य ११ ते १३ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंदिया-नागपूर-गोंदिया रेल्वे प्रवास बाधित होणार आहे.
दपूम मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत काचेवानी, गंगाझरी व गोंदिया रेल्वे स्थानकांत आॅटोसिग्नलिंग जोडण्यासाठी ११ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून १३ जूनच्या सकाळी ८ वाजतापर्यंत म्हणजेच तीन दिवसांपर्यंत नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य करण्यात येत आहे.
नॉन इंटरलॉकिंगचे कार्य काचेवानी स्थानकात ११ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून १२ जून रोजी रात्री २ वाजतापर्यंत तब्बल १८ तासांपर्यंत करण्यात येणार आहे. गंगाझरी स्थानकात ११ ते १२ जूनच्या रात्री २ वाजतापर्यंत व गोंदिया स्थानकात ४८ तासांपर्यंत ११ जूनच्या सकाळी ८ वाजतापासून १३ जूनच्या सकाळी ८ वाजतापर्यंत करण्यात येणार आहे.
त्यामुळे काही प्रवासी गाड्या रद्द, काही गाड्यांना विविध स्थानकांत नियंत्रित तर काही गाड्यांना गंतव्य स्थळापूर्वीच समाप्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या
११ व १२ जून रोजी (६८७१४/६८७१५) इतवारी-गोंदिया-इतवारी, (७८८१९/७८८२०) बल्लारशाह-गोंदिया-बल्लारशाह, (७८८२१/७८८२२) गोंदिया-कटंगी-गोंदिया, (७८८०१/७८८०२) गोंदिया-कटंगी-गोंदिया, (७८८०७/७८८०८) गोंदिया-वाराशिवनी-गोंदिया, (५८८१९/५८८२०) गोंदिया-समनापूर-गोंदिया व (६८७२९) डोंगरगड-गोंदिया मेमो या गाड्या रद्द राहणार आहेत.
मार्ग परिवर्तन होणाऱ्या गाड्या
११ जून रोजी चेन्नईवरून रवाना होणारी (१२८५२) चेन्नई-बिलासपूर एक्स्प्रेस बल्लारशाह-नागभीड-गोंदिया ऐवजी परिवर्तीत मार्ग बल्लारशाह-नागपूर-भंडारा रोड-गोंदिया वरून धावेल.
गंतव्य स्थळापूर्वीच समाप्त-आंशिक रद्द गाड्या
१० व ११ जून रोजी (१२१०५) मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस नागपूरमध्येच समाप्त होईल. या गाडीला ११ व १२ जून रोजी (१२१०६) गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस बनवून मुंबईसाठी रवाना करण्यात येईल.
१० व ११ जून रोजी (११०३९) कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरमध्येच समाप्त करण्यात येईल. १२ व १३ जून रोजी या गाडीला (११०४०) गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस बनवून कोल्हापूरसाठी नागपूरवरून रवाना करण्यात येईल.
१० व ११ जून रोजी (१५२३१) बरोनी-गोंदिया एक्स्प्रेसला दुर्गमध्येच समाप्त करण्यात करून दुर्गवरूनच ११ व १२ जून रोजी (१५२३२) गोंदिया-बरोनी एक्स्प्रेस बनवून बरोनीसाठी रवाना करण्यात येईल.
११ व १२ जून रोजी (१२०६९) रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेस दुर्गमध्येच करून या गाडीला दुर्गवरून ११ व १२ जून रोजी (१२०७०) गोंदिया-रायगड जनशताब्दी एक्स्प्रेस बनवून रायगडसाठी रवाना करण्यात येईल.
११ व १२ जून रोजी (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमोला दुर्गमध्येच समाप्त करून या गाडीला दुर्गवरून १२ व १३ जून रोजी (६८७२४) गोंदिया-रायपूर मेमो बनवून रायपूरसाठी सोडण्यात येईल.
११ व १२ जून रोजी (५८११७) झारसुगुडा-गोंदिया पॅसेंजरला दुर्गमध्येच समाप्त करून दुर्गवरून १२ व १३ जून रोजी (५८११८) गोंदिया-झारसुगुडा पॅसेंजर बनवून झारसुगुडासाठी रवाना करण्यात येईल.