लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूर रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या काचेवानी, गंगाझरी व गोंदिया रेल्वे स्थानकांमध्ये आॅटोसिग्नलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य ११ ते १३ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंदिया-नागपूर-गोंदिया रेल्वे प्रवास बाधित होणार आहे.दपूम मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत काचेवानी, गंगाझरी व गोंदिया रेल्वे स्थानकांत आॅटोसिग्नलिंग जोडण्यासाठी ११ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून १३ जूनच्या सकाळी ८ वाजतापर्यंत म्हणजेच तीन दिवसांपर्यंत नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य करण्यात येत आहे.नॉन इंटरलॉकिंगचे कार्य काचेवानी स्थानकात ११ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून १२ जून रोजी रात्री २ वाजतापर्यंत तब्बल १८ तासांपर्यंत करण्यात येणार आहे. गंगाझरी स्थानकात ११ ते १२ जूनच्या रात्री २ वाजतापर्यंत व गोंदिया स्थानकात ४८ तासांपर्यंत ११ जूनच्या सकाळी ८ वाजतापासून १३ जूनच्या सकाळी ८ वाजतापर्यंत करण्यात येणार आहे.त्यामुळे काही प्रवासी गाड्या रद्द, काही गाड्यांना विविध स्थानकांत नियंत्रित तर काही गाड्यांना गंतव्य स्थळापूर्वीच समाप्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे.रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या११ व १२ जून रोजी (६८७१४/६८७१५) इतवारी-गोंदिया-इतवारी, (७८८१९/७८८२०) बल्लारशाह-गोंदिया-बल्लारशाह, (७८८२१/७८८२२) गोंदिया-कटंगी-गोंदिया, (७८८०१/७८८०२) गोंदिया-कटंगी-गोंदिया, (७८८०७/७८८०८) गोंदिया-वाराशिवनी-गोंदिया, (५८८१९/५८८२०) गोंदिया-समनापूर-गोंदिया व (६८७२९) डोंगरगड-गोंदिया मेमो या गाड्या रद्द राहणार आहेत.मार्ग परिवर्तन होणाऱ्या गाड्या११ जून रोजी चेन्नईवरून रवाना होणारी (१२८५२) चेन्नई-बिलासपूर एक्स्प्रेस बल्लारशाह-नागभीड-गोंदिया ऐवजी परिवर्तीत मार्ग बल्लारशाह-नागपूर-भंडारा रोड-गोंदिया वरून धावेल.गंतव्य स्थळापूर्वीच समाप्त-आंशिक रद्द गाड्या१० व ११ जून रोजी (१२१०५) मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस नागपूरमध्येच समाप्त होईल. या गाडीला ११ व १२ जून रोजी (१२१०६) गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस बनवून मुंबईसाठी रवाना करण्यात येईल.१० व ११ जून रोजी (११०३९) कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरमध्येच समाप्त करण्यात येईल. १२ व १३ जून रोजी या गाडीला (११०४०) गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस बनवून कोल्हापूरसाठी नागपूरवरून रवाना करण्यात येईल.१० व ११ जून रोजी (१५२३१) बरोनी-गोंदिया एक्स्प्रेसला दुर्गमध्येच समाप्त करण्यात करून दुर्गवरूनच ११ व १२ जून रोजी (१५२३२) गोंदिया-बरोनी एक्स्प्रेस बनवून बरोनीसाठी रवाना करण्यात येईल.११ व १२ जून रोजी (१२०६९) रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेस दुर्गमध्येच करून या गाडीला दुर्गवरून ११ व १२ जून रोजी (१२०७०) गोंदिया-रायगड जनशताब्दी एक्स्प्रेस बनवून रायगडसाठी रवाना करण्यात येईल.११ व १२ जून रोजी (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमोला दुर्गमध्येच समाप्त करून या गाडीला दुर्गवरून १२ व १३ जून रोजी (६८७२४) गोंदिया-रायपूर मेमो बनवून रायपूरसाठी सोडण्यात येईल.११ व १२ जून रोजी (५८११७) झारसुगुडा-गोंदिया पॅसेंजरला दुर्गमध्येच समाप्त करून दुर्गवरून १२ व १३ जून रोजी (५८११८) गोंदिया-झारसुगुडा पॅसेंजर बनवून झारसुगुडासाठी रवाना करण्यात येईल.
ब्लॉकमुळे गोंदिया-नागपूर-गोंदिया रेल्वे प्रवास बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 9:32 PM
नागपूर रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या काचेवानी, गंगाझरी व गोंदिया रेल्वे स्थानकांमध्ये आॅटोसिग्नलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य ११ ते १३ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंदिया-नागपूर-गोंदिया रेल्वे प्रवास बाधित होणार आहे.
ठळक मुद्दे११ ते १३ जूनपर्यंत ब्लॉक : आॅटोसिंग्नलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य