ढिसाळ नियोजनामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:21 AM2018-03-29T00:21:30+5:302018-03-29T00:21:30+5:30

नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी मुर्हुत सापडत नव्हता. मात्र बऱ्याच कालावधीनंतर मुहूर्त सापडल्यानंतर सोमवारपासून (दि.२६) पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली.

Break on encroachment removal campaign due to poor planning | ढिसाळ नियोजनामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक

ढिसाळ नियोजनामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक

Next
ठळक मुद्देन.प.चे भूमिअभिलेख विभागाकडे बोट : मोहीमेसाठी पुन्हा तारीख

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी मुर्हुत सापडत नव्हता. मात्र बऱ्याच कालावधीनंतर मुहूर्त सापडल्यानंतर सोमवारपासून (दि.२६) पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. पण, अतिक्रमण नसलेल्यांना सुद्धा न.प.च्या नगर रचना विभागाने नोटीस बजावली. परिणामी नगर परिषदेला अर्ध्यावरच मोहीम थांबवावी लागली. मोहीम सुरु करण्यापूर्वी योग्य नियोजन केल्याचा या मोहिमेला फटका बसला.
शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे मुख्य रस्ते दिवसेंदिवस अधिक अरुंद होत चाललेले आहे. यामुळे शहरात वाहतुकीच्या कोंडीचे चित्र नेहमीच पाहयला मिळते. याचा फटका शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शहरातील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.
अतिक्रमण हटाव मोहीमेबाबत नगर परिषदेचा अनुभव चांगला नाही. अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान मारहाणीचे प्रकार सुध्दा घडले आहेत. तर बरेचदा राजकीय अडचण आड येत असते. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यासाठी नगर परिषदेकडून तारीख पे तारीख दिली जात होती. पण, बऱ्याच कालावधीनंतर नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचा मुर्हुत सापडला. भूमिअभिलेख विभागाकडून अतिक्रमणीत जागेची मोजणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारपासून (दि.२६) शहरातील कुडवा चौक ते एनएमडी कॉलेजपर्यंतचे अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली.
मात्र या दरम्यान अतिक्रमण नसलेल्या काही जणांना नोटीस बजाविण्यात आली. पण, त्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे इतर अतिक्रमणधारकांनी यावर आक्षेप घेत आमचे अतिक्रमण हटविले मग त्यांना का सुट असा सवाल न.प.मुख्याधिकाºयांना उपस्थित केला. ज्यांना नोटीस बजाविण्यात आली त्यांचे अतिक्रमण नसून न.प.नगररचना विभागाच्या चुकीमुळे त्यांना नोटीस गेल्याचे सांगितले.
मात्र नगररचना विभागाच्या चुकीमुळे मोहीमेदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली. तसेच अधिकाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
त्यामुळे नगर परिषदेला अर्ध्यावरच मोहीम थांबवावी लागली. मंगळवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात होईल, या प्रतिक्षेत नागरिक होते. मात्र नियोजन फसल्याने अतिक्रमण हटाव मोहीम लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या अधिकाºयांनी दिली.
पालिकेने फोडले भूमिअभिलेख विभागावर खापर
अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान नोटीस बजाविण्यावरुन वाद निर्माण झाला. तेव्हा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भूमिअभिलेख विभागाने दिलेल्या मोजणीच्या यादीनुसारच नोटीस बजाविल्याचे सांगितले. त्यावेळीच भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही दिलेल्या यादीत संबंधित अतिक्रमणधारकांची नावे नसल्याचे सांगितले. ही चूक नोटीस काढणाऱ्या नगररचना विभागाची असल्याचे सांगीतले तेव्हा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.

Web Title: Break on encroachment removal campaign due to poor planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.