लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील बीएसएनएलच्या मुख्य केंद्राकडे १३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने या कार्यालयाचा व या अंतर्गत आठ उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित केला. परिणामी तालुक्यातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली असून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वी सुध्दा या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.त्यानंतर आता पुन्हा थकीत वीज बिलामुळे पुरवठा खंडित करण्यात आल्याने बीएसएनएलची आर्थिक स्थिती सुधारली नसल्याचे चित्र आहे.तालुक्यातील शासकीय, खाजगी कार्यालय, बँका आणि ग्राहाकांना येथील बीएसएनएल कार्यालयातंर्गत दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरविली जाते. यासाठी गोरेगाव येथे मुख्य केंद्र आणि तालुक्यात आठ उपकेंद्र आहेत. मात्र मुख्य केंद्रासह आठही उपकेंद्राकडे १३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल मागील दोन तीन महिन्यापासून थकल्याने वीज वितरण कंपनीने या कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडीत केला. परिणामी तालुक्यातील दूरध्वनी आणि इंटरनेटसेवा ठप्प झाली आहे.महावितरण कंपनीने गोरेगाव मुख्य दूरसंचार विभागासह उपविभाग कवलेवाडा,कुºहाडी, तिमेझरी, मुंडीपार, पालेवाडा, बबई, चोपा,सोनी केंद्राच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा वीज बिल भरण्याची सूचना महावितरण कंपनीने केली होती. पंरतूू त्यांनी अद्यापही वीज बिल भरले नाही. त्यामुळे या उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत केला.परिणामी मागील पंधरा दिवसांपासून या भागातील बीएसएनएलची दूरध्वनी व इंटरनेट सेवा टप्प पडल्याची माहिती आहे. गोरेगाव मुख्य दूरसंचार विभागावर ५ लाख ७१ हजार रु पये, बबई उपकेंद्र ७७ हजार ८०० रु पये, मुंडीपार उपकेंद्र १ लाख ४ हजार ५०० रुपये, चोपा उपकेंद्र १ लाख ४६ हजार रु पये, पालेवाडा उपकेंद्र ९६ हजार ५०० रु पये कुºहाडी उपकेंद्र १ लाख १ हजार रुपये, सोनी उपकेंद्र ७७ हजार रुपये कवलेवाडा उपकेंद्र १ लाख ४२ हजार रु पये, तिमेझरी उपकेंद्र ३३ हजार रु पयांचे वीज बिल थकीत आहे.गोरेगाव येथील मुख्य दूरसंचार विभागासह उपकेंद्राकडे एकूण १३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे या केंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. परिणामी दूरध्वनी आणि इंटरनेटसेवा टप्प झाली आहे. कार्यालयात जनरेटर व बॅटरी सेवा उपलब्ध आहे. परंतु ४० लिटर इंधन उपलब्ध असल्याने एकच दिवस सेवा देता येणार आहे.- टी.बी.रहांगडालेतंत्रज्ञ दूरसंचार विभाग गोरेगाव.
बीएसएनएल कार्यालयाचा वीज पुरवठा पुन्हा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 6:00 AM
तालुक्यातील शासकीय, खाजगी कार्यालय, बँका आणि ग्राहाकांना येथील बीएसएनएल कार्यालयातंर्गत दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरविली जाते. यासाठी गोरेगाव येथे मुख्य केंद्र आणि तालुक्यात आठ उपकेंद्र आहेत. मात्र मुख्य केंद्रासह आठही उपकेंद्राकडे १३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल मागील दोन तीन महिन्यापासून थकल्याने वीज वितरण कंपनीने या कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडीत केला. परिणामी तालुक्यातील दूरध्वनी आणि इंटरनेटसेवा ठप्प झाली आहे.
ठळक मुद्दे१३ लाखांचे वीज बिल थकले : दूरध्वनी सेवा ठप्प, ग्राहकांना मनस्ताप