लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक माणिक मसराम यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन संशयास्पद मृत्यूचे वास्तव जनतेसमोर आणावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारिणीने केली आहे. यासाठी उपविभागीय अधिकाºयांच्यामार्फत सोमवारी (दि.४) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.नगरसेवक माणिक मसराम यांचा गावापासून २ किमी अंतरावरील ग्रामीण रुग्णालयाच्या आवार भिंतीजवळ २१ मे रोजी मृतदेह आढळला होता. त्यांचा अपघात झाला की, घातपात अशा चर्चा होत आहेत. मसराम यांच्या मृत्यूमुळे भाजपाची नाहक बदनामी होत असल्याने सदर प्रकरणाचा छडा लावून मसराम यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी सोमवारी (दि.४) उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, रत्नाकर बोरकर, नुतन सोनवाने, व्यंकट खोब्रागडे, बाळू बडवाईक, होमराज ठाकरे, संदीप कापगते, प्रशांत नाकाडे यांचा समावेश होता.
मसराम यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:08 AM
अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक माणिक मसराम यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन संशयास्पद मृत्यूचे वास्तव जनतेसमोर आणावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारिणीने केली आहे.
ठळक मुद्देतालुका भाजपची मागणी : उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन