लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : इंग्रजीत सेव्हन्टी थ्री वाचणाऱ्या विद्यार्थ्याला मराठीतील त्र्याहत्तर कळत नाही म्हणून चक्क मराठीतील संख्या वाचनाची पध्दतच बदलून टाकण्याच्या धाडसी, क्रांतीकारक व तितकाच हास्यास्पद निर्णय यावर्षी बालभारतीचे घेतला आहे.विद्यार्थ्याना इंग्रजी संख्या वाचन व लेखन भराभरा येतात. परंतु तीच किंबहुना त्यापेक्षा लहान मराठी संख्या वाचन व लेखन करताना विद्यार्थ्याची चांगलीच दमछाक होते. म्हणून विद्यार्थ्याची ही धांदल थांबविण्यासाठी बालभारतीने यावर्षीपासून चक्क मराठी संख्या वाचन व लेखनाची पध्दतच बदलून टाकण्यात आली आहे. त्यासाठी दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात यावर्षीपासून काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.सदर बदल मराठीतील संख्या २४ ते ९९ या संख्या वाचन व लेखनात करण्यात आले आहे. यापुढे मराठीत संख्या वाचन वा लेखन करताना सत्तावीस ऐवजी वीस सात,अठ्ठावीस ऐवजी वीस आठ, पंच्याहत्तर ऐवजी सत्तर पाच, पासष्ट ऐवजी साठ पाच, त्र्यान्नव ऐवजी नव्वद तीन असे बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे बरीच जोडाक्षरे गाळली जातात आणि बोलणे व लिहीणे यांचा क्रम सारखा येतो.जसे पंचेचाळीसमध्ये आधी पाच मग चाळीस येतात परंतु ही संख्या ४५ अशी लिहीताना आधी चाळीसचा चार व नंतर पाच लिहीला जातो.शिवाय जोडाक्षरे असणारे शब्द (जसे ब्याण्णव, अठ्यान्नव, सत्याऐंशी, चौºयाहत्तर, अठ्ठेचाळीस इ.) पाठ करावे लागत नाही आणि लिहावेही लागत नाही. म्हणून यापुढे शिक्षक शिकविताना व विद्यार्थी, पालक संख्या वाचन, लेखन करताना वीस सात (२७), नव्वद आठ (९८), साठ सात (६७) असे वाचन लेखन करतील. असे कारण याबाबत बालभारतीच्या वतीने देण्यात आले आहे.दरम्यान काही विद्यार्थी आधीच परंपरागत पध्दतीने सत्तावीस, चौºयान्नव, अडुसष्ट असे शब्द शिकले असतील तर दोन्ही प्रकारचे शब्द ग्राह्य धरले जातील. शिवाय शब्दात संख्या लिहितांना विद्यार्थ्यांना नवी पध्दत सोपी वाटेल असा आशावाद बालभारतीने व्यक्त केला आहे. मराठी संख्या वाचन व लेखनाच्या या नव्या पध्दतीने वाचन इंग्रजी प्रमाणेत कानडी, तेलगू, मल्याळी, तामीळ व इतर दक्षिण भारतीय भाषांमध्ये सुध्दा केले जाते.यामुळे जोडाक्षरे कमी होऊन वाचन सोपे होते व विद्यार्थ्यात गणिताची आवड निर्माण होण्यास मदत होते, अशी पुष्टी बाल भारतीने दिली आहे.गुरुजींची होणार दमछाकशालेय जीवनात नव्यानेच आलेल्या कोरी पाटी असलेल्या विद्यार्थ्याला मराठी वाचनाची नवी पध्दत सोपी वाटणार व ते सहज आत्मसातही करतील परंतु बालपणापासून प्रदीर्घ नोकरीत पासष्ट-पंच्याहत्तर करणाºया गुरुजींची साठ पाच-सत्तर पाच करताना चांगलीच दमछाक होणार हे मात्र खरे.शिक्षणाचा विनोद होतोयबालभारतीने संख्या वाचनात केलेल्या बदल म्हणजे विद्यार्थ्याचे वाचन सोपे करणे नसून शिक्षणाचा विनोद करणे होय अशा तीव्र प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहेत.निरक्षरांना चौºयान्नव कळत नाही म्हणून नव्वद चार सांगणे म्हणजे विद्यार्थ्याना साक्षर नव्हे निरक्षण बनविणे आहे, हीच पध्दत यापुढे हिंदीतही वापरणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बालभारतीचा संख्या वाचनात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:52 PM
इंग्रजीत सेव्हन्टी थ्री वाचणाऱ्या विद्यार्थ्याला मराठीतील त्र्याहत्तर कळत नाही म्हणून चक्क मराठीतील संख्या वाचनाची पध्दतच बदलून टाकण्याच्या धाडसी, क्रांतीकारक व तितकाच हास्यास्पद निर्णय यावर्षी बालभारतीचे घेतला आहे.
ठळक मुद्देजोडाक्षरे गाळण्यासाठी त्र्याहत्तर होणार सत्तर तीन : वाचन सोपे करणार