बांधकामादरम्यान लिफ्ट कोसळल्याने चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:57+5:302021-07-05T04:18:57+5:30
प्राप्त माहितीनुसार, मोरेश्वर तिडके यांच्या घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. स्लॅब टाकण्यासाठी शनिवारी लाखेगाव येथील मन्सूर खोब्रागडे यांची लिफ्ट भाड्याने ...
प्राप्त माहितीनुसार, मोरेश्वर तिडके यांच्या घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. स्लॅब टाकण्यासाठी शनिवारी लाखेगाव येथील मन्सूर खोब्रागडे यांची लिफ्ट भाड्याने बोलविण्यात आली होती. बांधकाम सुरू असलेल्या घरालगत असलेल्या झोपडीत चार मुले राहत होती. दरम्यान, स्लॅबचे काम सुरू झाले होते. काँक्रीट स्लॅबवर जाताच लिफ्ट नीट बांधली नसल्याने लिफ्ट काँक्रीटसह झोपडीवर कोसळली. जिगरला काही कळण्याच्या आत तो लिफ्टच्या खाली दबल्या गेल्या. तर झाेपडीत असलेली तीन बालके थोडक्यात बचावली. जिगरला गंभीर दुखापत झाल्याने त्याला त्वरित तुमसर उपजिल्हा रुग्णालय व पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. जिगरवर उपचार सुरू असतानाच रविवारी (दि. ४) त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंडीकोटा गावात शोककळा पसरली होती.