नागरिकांनो लसीकरणासाठी बिनधास्त पुढे या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:26+5:302021-04-29T04:21:26+5:30
बिरसी फाटा : काेरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण संदर्भात ...
बिरसी फाटा : काेरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण संदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणासाठी बिनधास्तपणे पुढे यावे. असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले.
तालुक्यातील नवेझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आ. रहांगडाले यांनी लसीकरणाचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र नवेझरी अंतर्गत येणारे नवेझरी, सोनेखारी, कुलपा सितेपार, खेडेपार गावनिहाय कोरोना रुग्ण संख्या,गावातील आजची परिस्थिती तसेच लसीकरण किती झाले याची सविस्तर माहिती घेतली. गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून ताप सर्दी, ऑक्सिजन मोजून नोंदणी करण्याचा उपक्रम राबवा त्यामुळे गावाची परिस्थिती कळेल, तशी उपाययोजना करण्यास सोयीस्कर होईल. लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करून जास्तीत जास्त लसीकरण गावात करून घेण्यास सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी अजय नाष्टे जे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करीत नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सांगितले. ग्राममंडळ अध्यक्ष महेंद्र भांडारकर, उपाध्यक्ष प्रभुदास ऊके, पोलीस पाटील प्रकाश भांडारकर, तंटामुक्त समिती उपाध्यक्ष भास्कर बावनथडे, अजय भांडारकर, प्रमोद मंदूरकर, राजू नांदगावे, ग्रामसेवक एम. बी. मेश्राम,आरोग्य विभागाचे डॉ. कुंभारे उपस्थित होते.