स्वच्छता अभियान नावापुरतेच

By admin | Published: April 21, 2015 12:43 AM2015-04-21T00:43:26+5:302015-04-21T00:43:26+5:30

शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे,

Cleanliness campaign names only | स्वच्छता अभियान नावापुरतेच

स्वच्छता अभियान नावापुरतेच

Next

घाणीचे साम्राज्य : स्वच्छ भारत मिशन अपयशी
गोरेगाव : शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे, याचे विविध योजनेतून, प्रबोधनातून बाळकडू पाजले, तसे निर्देशही दिले. पण येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही. म्हणून प्रशासनाने राबविलेला ‘स्वच्छता अभियान’ नुसत्या कागदावरच स्वच्छ झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.
देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता ही अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानतात. त्यामुळे स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा माणस होता. परंतु कालौघात खेडी, शहरे अधिक अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त होत गेली. उघड्यावरील प्रात:विधीने तर मोठे संकट उभे केले. शेवटी स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त झाले.
या चळवळीत गावची गावे सहभागी झाली. या चळवळीला कुशल व धोरणी नेतृत्व मिळाले. त्यामुळे या स्वच्छता चळवळीतील लोकसहभाग पाहण्यासारखा होता. मात्र कालांतराने स्वच्छता चळवळीतील लोकसहभाग कमी झाल्यामुळे आजघडीला स्वच्छता अभियान नावापुरतेच मर्यादित राहिले आहे.
‘स्वच्छता’ ही सर्वांची जबाबदारी आहे, हे येथील समाजमन मानायला तयार नाही. घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याची सवय अजूनही येथील नागरिकांची गेली नाही. म्हणून कचरा वाढत आहे. गावची गावे कचरामय होताना दिसत आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ या चळवळीमुळे लोकसहभागातून स्वच्छतेची जाणीव प्रत्येकाला झाली नाही. त्यामुळे आजघडीला स्वच्छता टिकवून ठेवणे लोकांना जमले नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cleanliness campaign names only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.