अवैध दारु विक्री बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:56 PM2018-09-19T21:56:49+5:302018-09-19T21:57:03+5:30

तालुक्यातील कुºहाडी येथे मागील काही वर्षांपासून अवैध दारु व्यवसाय सुरु आहे. येथील अवैध दारु विक्रीविरुद्ध बरेचदा आंदोलन करण्यात आले. मात्र यानंतरही गावात अवैधपणे दारुची विक्री सुरुच आहे. परिणामी गावातील वातावरण कलुषीत होत असून भांडतंट्यात वाढ झाली आहे.

Close the sale of illegal ammunition | अवैध दारु विक्री बंद करा

अवैध दारु विक्री बंद करा

Next
ठळक मुद्देमहिलांचे नायब तहसीलदारांना निवेदन : अन्यथा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील कुºहाडी येथे मागील काही वर्षांपासून अवैध दारु व्यवसाय सुरु आहे. येथील अवैध दारु विक्रीविरुद्ध बरेचदा आंदोलन करण्यात आले. मात्र यानंतरही गावात अवैधपणे दारुची विक्री सुरुच आहे. परिणामी गावातील वातावरण कलुषीत होत असून भांडतंट्यात वाढ झाली आहे.
त्यामुळे गावातून अवैध दारु विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे. बुधवारी (दि.१९) यासंबंधिचे निवेदन गावातील महिलांतर्फे नायब तहसीदार नरेश वेदी यांना देण्यात आले. विशेष म्हणजे कुºहाडी यशवंत ग्राम पुरस्कार, तंटामुक्त निर्मल ग्राम पुरस्काराने पुरस्कृत आहे. शहीद जान्या-तिम्या यांची कुºहाडी ही कर्मभूमी आहे. इतिहासाच्या पानावर कुºहाडी शहीद भूमी म्हणून ओळखली जाते. शिवाय परिसरातील मोठे गाव असल्याने येथे बाजारपेठ सुध्दा आहे. मात्र गावात अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने गावातील अनेक कर्ते पुरूष व तरुण व्यसनाच्या आहारी जात आहे.
यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय गावातील वातावरण सुध्दा दिवसेंदिवस कलुषीत होत आहे. गावातील अवैध दारु विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी. अशी मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र संबंधित विभागांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे याचा त्रास गावातील महिलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची दखल घेत प्रशासनाने कुºहाडी येथील अवैध दारु विक्री त्वरीत बंद करण्याची मागणी नायब तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शिष्टमंडळात सरपंच अल्का पारधी, सुषमा डुंभरे, माया पडोळे, पुष्पा मौजे, बेनू टेंभरे, छाया लांजेवार,जयशिला नांदगाये, विमला येळणे, प्रभा पटले, योगीता सेऊतकर, शकुंतला सोनवाने, लक्ष्मी टेंभेकर यांचा समावेश होता.

Web Title: Close the sale of illegal ammunition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.