कोच राहणार आॅल टाईम नीट अ‍ॅन्ड क्लिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:51 AM2018-03-14T00:51:20+5:302018-03-14T00:51:20+5:30

रेल्वे गाड्यांच्या कोचमधील साफ सफाईचा मुद्दा बरेचदा प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. बऱ्याच प्रवाशांनी रेल्वे मंत्र्यांना व्टिट करुन कोचमधील स्वच्छतेचा मुद्दा निदर्शनास आणून दिला.

The coach will stay well-clean and clean | कोच राहणार आॅल टाईम नीट अ‍ॅन्ड क्लिन

कोच राहणार आॅल टाईम नीट अ‍ॅन्ड क्लिन

Next
ठळक मुद्देप्रत्येक कोचसाठी स्वतंत्र सफाई कर्मचारी : ९ गाड्यांमध्ये सुविधेला सुरुवात

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : रेल्वे गाड्यांच्या कोचमधील साफ सफाईचा मुद्दा बरेचदा प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. बऱ्याच प्रवाशांनी रेल्वे मंत्र्यांना व्टिट करुन कोचमधील स्वच्छतेचा मुद्दा निदर्शनास आणून दिला. त्यानंतर रेल्वे विभागाने रेल्वे गाड्यांमधील स्वच्छतेची बाब गांर्भियाने घेत गाडी सुटणाऱ्या ठिकाणापासून ते शेवटच्या स्थानकापर्यंत कोचमध्ये स्वच्छता राखण्यासाठी स्वतंत्र सफाई कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे रेल्वेचे कोच आता ‘स्टॉर्ट टू एन्ड पर्यंत नीट अ‍ॅन्ड क्लिन’ राहणार आहे.
दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभागातर्फे रेल्वे प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र रेल्वे गाड्यांमधील स्वच्छतेच्या मुद्यावरुन रेल्वे प्रशासनाला नेहमीच प्रवाशांच्या रोषाला समोर जावे लागत होते. सर्वसाधारण आणि एसी कोच ची एकदा गाडी सुटण्याच्या ठिकाणावरुन साफसफाई केल्यानंतर पुन्हा केली जात नव्हती. त्यामुळे गाडीच्या शेवटच्या स्थानकांपर्यंत प्रवाशांना कोचमधील केरकचऱ्यासह प्रवास करावा लागत होता. प्रवासासाठी पैसे मोजून देखील असुविधा मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता.
रेल्वे प्रशासनाने उशीरा का होईना कोचच्या स्वच्छतेचा मुद्दा गांर्भियाने घेतला. तसेच गाडीमध्ये प्रत्येक कोचसाठी स्वतंत्र सफाई कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. गाड्यांमध्ये ‘आॅन बोर्ड हॉस्पीटीलीटी सव्हिर्स’(ओबीएचएस) ही सेवा सुरू केली आहे.
ओबीएचएस सेवेअतंर्गत सफाई कर्मचारी रेल्वे गाड्यांमध्ये चौवीस तास उपलब्ध राहणार असून प्रत्येक स्टेशननंतर प्रत्येक कोचची साफसफाई करणार आहेत. या सफाई कर्मचाºयांना रेल्वे विभागातर्फे प्रशिक्षण व ड्रेसकोड व सफाईचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
टप्प्याटप्याने सर्वच गाड्यांमध्ये
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने सुरूवातीला ओबीएचएस ही सुविधा ९ एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुरू केली आहे. यानंतर टप्प्या टप्याने ही सुविधा सर्वच एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुरू केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.
सुरुवातीला ९ एक्सप्रेस गाड्यात ओबीएचएस
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने ओबीएचएस ही सुविधा बिलासपुरवरुन सुटणाऱ्या ९ एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुरू केली आहे. छत्तीसगढ एक्सप्रेस, नर्मदा एक्सप्रेस, इंटरसिटी शिवनाथ एक्सप्रेस, बिलासपुर चेन्नई एक्सप्रेस, बिलासपुर भगत कोठी एक्सप्रेस, बिलासपुर बीकानेर एक्सप्रेस, बिलासपुर पटना एक्सप्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे.
एसएसएसवर तक्रारीची सुविधा
रेल्वे गाड्यांमधील कोचमध्ये केरकचरा असल्यास किंवा साफ सफाई करण्यास सफाई कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यास त्याची तक्रार प्रवाशांना ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करता येणार आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ही सुविधा सुरू असणार आहे.

Web Title: The coach will stay well-clean and clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.