गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. त्यामुळे रबीतील कापणी केलेल्या धानाची चिंता, तर फेडरेशनला खरिपातील विविध केंद्रांवर उघड्यावर असलेल्या १ लाख क्विंटल धानाची चिंता सतावीत आहे. खरिपातील धानाची उचल युद्धपातळीवर होईपर्यंत रबीतील खरेदी सुरू करता येणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी या विभागाने गोदामांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात मागील खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ३४ लाख क्विंटल धान खरेदी केली होती; पण धानाची गुणवत्ता, भरडाईदरम्यान येणारी तूृट यामुळे राइस मिलर्सने धानाची उचल केली नव्हती. तीन प्रशासनाने केवळ तीन महिने चर्चेत काढले. तोपर्यंत रबीतील धान खरेदीची वेळ येऊन ठेपली, तर यंदा रबीत सर्वाधिक ६६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. जवळपास ३० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज आहे. मात्र, खरिपातील धानाची उचल न झाल्याने गोदाम हाऊसफुल आहेत, तर मोठे खासगी गोदाम भाड्याने घेऊन यावर तोडगा काढण्याची जिल्हा प्रशासनाची अद्यापही मानसिकता आहे. मात्र, या सर्वांत भरडला जात आहे तो शेतकरी. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यातच रबीतील धानाची विक्री झाली नसल्याने खरिपासाठी खते, बियाणे याची खरेदी आणि मशागतीची कामे कशी करावीत याच विवंचनेत सध्या बळीराजा आहे. मात्र, जिल्हा प्रशासन केवळ लवकरच केंद्र सुरू करू यापलीकडे काहीच करीत नसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश संस्थांना दिले असले तरी गोदामात धान असल्याने खरेदी करणार तरी कशी, असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.
..........
खासगी गोदाम भाड्याने घेण्यासाठी कुणाची प्रतीक्षा
रबीतील धान खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी गोदाम भाड्याने घेण्याची गरज आहे; पण यासाठी नेमकी कुणाची प्रतीक्षा केली जात आहे हे कळण्यास अद्यापही मार्ग नाही. मात्र, या सर्व गोंधळात रबीची खरेदी खरिपात करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, असे झाल्यास अर्ध्याहून अधिक शेतकरी खासगी शेतकऱ्यांना धानाची विक्री करून मोकळे झाले असतील, हे मात्र निश्चित आहे.
सूचना : यावर तोडगा काढण्याची जिल्हा प्रशासनाची अद्यापही मानसिकता ----आहे. की नाही पाहिजे ते घ