२१५ व्यावसायिकांनी केली कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:31 AM2021-05-20T04:31:23+5:302021-05-20T04:31:23+5:30

नगरपंचायतीच्या वतीने बुधवारी सकाळी व्यावसायिकांना चाचणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. व्यावसायिकांनी यापूर्वीसुद्धा कोरोना चाचणी केली होती. मात्र व्यवसाय करताना ...

Corona tested by 215 professionals | २१५ व्यावसायिकांनी केली कोरोना चाचणी

२१५ व्यावसायिकांनी केली कोरोना चाचणी

Next

नगरपंचायतीच्या वतीने बुधवारी सकाळी व्यावसायिकांना चाचणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. व्यावसायिकांनी यापूर्वीसुद्धा कोरोना चाचणी केली होती. मात्र व्यवसाय करताना त्यांचा ग्राहकांशी दैनंदिन संबंध येतो. यातून कोरोनाच्या प्रसाराची शक्यता नाकारता येत नाही. व्यावसायिक कोरोनामुक्त असणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून या मोहिमेची बुधवारी सुरुवात करण्यात आली. यात २१५ व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करून घेतली. या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी सकाळी करण्यात आला. या वेळी गटविकास अधिकारी राठोड, मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत आदी उपस्थित होते. या शिबिराला उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी भेट दिली. या आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल दोन-तीन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Corona tested by 215 professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.