कोरोनानंतरचे साइड इफेक्टस वाढले; औषधी काळजीपूर्वक घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:30 AM2021-05-12T04:30:29+5:302021-05-12T04:30:29+5:30
स्टेरॉइड्सचे साईड इफेक्ट कोरोना साथीच्या वेळी रुग्णालयात गर्दी होऊ नये म्हणून आणि डॉक्टरांपासून लांब पळण्यासाठी लोक सल्लामसलत करून औषध ...
स्टेरॉइड्सचे साईड इफेक्ट
कोरोना साथीच्या वेळी रुग्णालयात गर्दी होऊ नये म्हणून आणि डॉक्टरांपासून लांब पळण्यासाठी लोक सल्लामसलत करून औषध घेतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अँटिव्हायरल, स्टेरॉईड्स आणि अँटिबायोटिक्स घेण्यात येत असतात. स्टेरॉईडचा वापर हा ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांमध्ये करू नये. जिल्हा रुग्णालयात असे रूग्ण आले नाहीत. परंतु स्टेरॉईड्सच्या साईड इफेक्ट अंतर्गत औषध खाल्ल्यावर तंद्री, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे किंवा डोकेदुखीचा त्रास होतो.
...........
काय होतात परिणाम
म्युकरमायकोसिस आजार झाल्यास रुग्णांमध्ये नाक बंद होणे, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणे, गालाचे हाड दुखणे, चेहऱ्याच्या एका बाजूने दुखणे, दात दुखणे, दात हलणे व पडणे, जबडा दुखणे, डोळे दुखणे, छाती दुखणे, श्वास घेण्यात त्रास आदी लक्षणे दिसू लागतात. नाक बंद झालेल्या सर्वच रुग्णांना हा आजार झाल्याचे समजू नका. हा आजार बुरशीचा संसर्ग आहे. जे रुग्ण जास्त काळ इतर आजारांचा उपचार घेतात त्यांची वातावरणातील रोगजंतूंशी लढण्याची क्षमता कमी होते. अशावेळी या संसर्गाचा धोका वाढतो.
..........
धूळ असलेल्या ठिकाणी किंवा बांधकामाच्या ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर करा. हा बुरशीजन्य आजार आहे. स्वच्छता पाळा तसेच अन्य नियमांचे पालन करा. या आजारावरील ‘एम्फोटेरीसीन बी’ हे इंजेक्शन महागडे आहे. परिणामी लक्षणे दिसताच जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करा.
- डॉ. संजय भगत, ईएनडी तज्ज्ञ ()
........
काेरोना रुग्णाला म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास याबाबत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी सुचविलेला औषधोपचार करावा. याबाबत संशय आल्यानंतर किंवा तसे स्पष्ट झाल्यानंतर औषधोपचार घेण्यास उशीर करू नका.
या आजाराची लक्षणे दिसताच क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.
- डॉ. राहुल उईके ()
.......
रेमडेसिविरचे साईड इफेक्टस
रेमडेसिविरचा वापर पूर्णपणे प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही, मात्र उपचाराच्या प्रायोगिक पद्धतीनुसार हे इंजेक्शन देण्यात येत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारपद्धतीमध्ये या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. संसर्ग झालेल्या पहिल्या दहा दिवसांमध्ये पाच दिवसांसाठी इंजेक्शनचा डोस देण्यात यावा. दहा दिवसांसाठी हा डोस देण्याची गरज नाही. हे इंजेक्शन दिल्यानंतर काही रुग्णांमध्ये उलट्या होणे, हातपाय थरथरणे, जुलाब, चक्कर येण्यासारखे त्रासही दिसून आले आहेत.